इवल्याशा चिमुकल्याने महिलेसोबत केलं असं काही की पाहूनच बसेल धक्का; VIDEO VIRAL
इवल्याशा चिमुकल्याने महिलेसोबत केलं असं काही की पाहूनच बसेल धक्का; VIDEO VIRAL
एका रेस्टॉरंटमध्ये एक कुटुंब जेवण करण्यासाठी गेल्याचं व्हिडिओमध्ये (Funny Video) दिसतं. यात दिसतं की सर्वजण बसून जेवण करत आहेत. या कुटुंबासोबत एक लहान बाळही आलेलं असतं
नवी दिल्ली 03 एप्रिल : तुमच्या घरात लहान मुलं असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की लहान मुलं खूप खोडकर असतात. कधी कधी ही मुलं असं कृत्य करतात, ज्याचा विचार करूनही हसू येतं. कधीकधी त्यांच्या खोडसाळपणामुळे मोठं नुकसानही सहन करावं लागतं. मुलांना थोडं चालता आलं की ते एका जागी शांत बसतही नाहीत. मग त्यांना एका ठिकाणी बसवून ठेवणंही कठीण होतं (Naughty Child Video).
मुलं एका जागी बसून राहात नाहीत असं सगळेच सांगतात. ते घरभर फिरत राहातात आणि काहीतरी करत राहातात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये लहान मुलाचं कृत्य पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. मुलाचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे, जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक लहान बाळ असं कृत्य करतं, ज्यामुळे महिला धाडकन खाली कोसळते..
एका रेस्टॉरंटमध्ये एक कुटुंब जेवण करण्यासाठी गेल्याचं व्हिडिओमध्ये (Funny Video) दिसतं. यात दिसतं की सर्वजण बसून जेवण करत आहेत. या कुटुंबासोबत एक लहान बाळही आलेलं असतं. वॉकरच्या मदतीने हा मुलगा इकडे तिकडे फिरत आहे. इतक्यात तिथे स्टूलवर बसलेली महिला आपल्या जागेवरून उठते आणि काहीतरी घेऊ लागते. महिला फक्त 1 सेकंदासाठी तिच्या स्टूलवरून उठते. यादरम्यान हा लहान मुलगा भलताच कांड करतो.
महिला आपल्या जागोवरुन उठताच लहान मुलगा खेळता खेळता हा स्टूल बाजूला करतो. यानंतर, महिलेने स्टूलवर बसण्याचा प्रयत्न करताच ती धाडकन खाली कोसळते. व्हिडिओ पाहून असं कळतं की या मुलाने हे जाणूनबुजून केलं नसून नकळतपणे त्याच्याकडून हे घडलं आणि महिला खाली कोसळली. इन्स्टाग्रामवर cute_baby_reel नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.