स्ट्रेचिंगच्या नादात तोल गेला अन्...; तरुणीसोबत घडली भयंकर घटना, VIDEO
स्ट्रेचिंगच्या नादात तोल गेला अन्...; तरुणीसोबत घडली भयंकर घटना, VIDEO
स्ट्रेचिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral on Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक तरुणी स्ट्रेचिंग करण्याच्या नादात धाडकन पाण्यात कोसळल्याचं पाहायला मिळतं.
नवी दिल्ली 04 जानेवारी : व्यायाम (Exercise), प्राणायम किंवा योगासनं आरोग्यासाठी किती लाभादायक असतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आरोग्यतज्ज्ञ सांगतात की जे लोक नियमित पद्धतीने हे सर्व करतात, त्यांचे आजारी पडण्याची शक्यता अतिशय कमी असते. त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम करावा, असा सल्ला डॉक्टर देतात. विशेषतः स्ट्रेचिंगबद्दल (Stretching) जर बोलायचं झालं तर याने आपल्या शरीराचा लवचिकपणा वाढतो आणि आपल्याला लवकर दुखापत होण्याची शक्यता कमी होते.
हैराण करणारी घटना कॅमेऱ्यात कैद; थोडक्यात बचावली महिला, पाहा अपघाताचा VIDEO
सोशल मीडियावर अनेकदा व्यायामाचे व्हिडिओ (Exercise Videos) व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा लोकांना पार्कमध्ये किंवा आपल्या घरात व्यायाम करताना पाहिलं असेल. आजकाल स्ट्रेचिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Video Viral on Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक तरुणी स्ट्रेचिंग करण्याच्या नादात धाडकन पाण्यात कोसळल्याचं पाहायला मिळतं.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही तरुणी वाहत्या ओढ्याच्या वरती स्ट्रेचिंग करत आहे. मात्र एक हात वरती करण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचा बॅलन्स बिघडतो आणि ती धाडकन नदीमध्ये कोसळते. पाणी वाहतं असल्याने काही अंतर ती पाण्यासोबतच वाहत जाते. हा व्हिडिओ हैराण करणारा आहे, कारण तरुणी ज्या पद्धतीने नदीत कोसळली, ते पाहून जाणवतं की तिला भरपूर लागलं असेल.
अवघ्या 6 सेकंदाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर brain_damage_x नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 53 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.तर, हजारो लोकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. व्हिडिओवर अनेक लोकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, हिला इथेच जागा मिळाली होती. इतरही अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत तरुणीची खिल्ली उडवली आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.