मराठी बातम्या /बातम्या /Viral /वॉश बेसिनमध्ये पाय धुणं भोवलं; घसरून धाडकन जमिनीवर आपटली तरुणी, VIDEO VIRAL

वॉश बेसिनमध्ये पाय धुणं भोवलं; घसरून धाडकन जमिनीवर आपटली तरुणी, VIDEO VIRAL

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता, की महिला पब्लिक टॉयलेटमधील वॉश बेसिनमध्ये आपले पाय धुताना दिसते. पहिला पाय धुतल्यानंतर ती आपला दुसरा पाय धुण्यासाठी वॉश बेसिनमध्ये ठेवते

नवी दिल्ली 24 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर अतिशय मजेशीर गोष्टी पाहायला मिळतात. ज्या पाहून लोकांचा दिवसच चांगला जातो. तर काही वेळा हैराण करणाऱ्या घटनाही समोर येतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ (Funny Video Viral) पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये.

अनेकदा आपल्या असं सांगितलं जातं, की सार्वजनिक शौचालयालाही (Public Toilet) आपल्या घरातील शौचालयाप्रमाणेच स्वच्छ ठेवलं पाहिजे. तिथली सफाई आणि इतर गोष्टींची काळजीही तशीच घ्यायला हवी जशी आपण आपल्या घरातील शौचलयाची घेतो. मात्र, अनेक लोक असे असतात, जे या सूचनांचं अजिबातही पालन करत नाहीत आणि पब्लिक टॉयलेटमध्ये काहीतरी विचित्र गोष्टी करत बसतात. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही महिला टॉयलेटमधील वॉश बेसिनमध्ये पाय धुताना दिसत आहे. मात्र, पुढच्याच क्षणी तिच्यासोबत असं काही घडतं, जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

VIDEO : मंडपातच नवरीचा गोंधळ; 'ती' इच्छा पूर्ण झाल्याशिवाय लग्न करण्यास नकार

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की महिला पब्लिक टॉयलेटमधील वॉश बेसिनमध्ये आपले पाय धुताना दिसते. पहिला पाय धुतल्यानंतर ती आपला दुसरा पाय धुण्यासाठी वॉश बेसिनमध्ये ठेवते अन् इतक्यात तिचा पाय अडकतो आणि ती धाडकन खाली पडते. हा मजेशीर व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर यूजर्सनं हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

आईच्या डोळ्यादेखत पिल्लाला जबड्यात धरून बिबट्या पसार; मन हेलावणारा VIDEO

एका यूजरनं यावर कमेंट करत म्हटलं, की ‘INSTANT KARMA’. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की अशा लोकांनी Toilet etiquette शिकायला हवेत. याशिवाय अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर punjabi_industry__ नावाच्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. काही तासांमध्येच हा व्हिडिओ 9 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.

First published:
top videos

    Tags: Funny video, Video Viral On Social Media