• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • आठवडाभरात ही महिला खाते 3 फूट भिंत; स्वतःच सांगितलं विचित्र सवयीमागील धक्कादायक कारण

आठवडाभरात ही महिला खाते 3 फूट भिंत; स्वतःच सांगितलं विचित्र सवयीमागील धक्कादायक कारण

निकोल नावाची ही महिला अमेरिकेच्या मिशिगन शहरात राहते. महिलेनं एका टिव्ही प्रोग्राममध्ये आपल्या या सवयीबद्दल सांगितलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

 • Share this:
  नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : जगभरात अनेक लोक आपल्या अजब कृत्यांमुळे आणि सवयींमुळे (Strange Habits) चर्चेत राहतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार आहोत, जिच्याबद्दल ऐकूनच तुम्हाला धक्का बसेल. हे जाणून तुम्ही हैराण व्हाल की ही महिला आपल्याच घराची भिंत खाते (Woman Eating Walls). निकोल नावाची ही महिला अमेरिकेच्या मिशिगन शहरात राहते. महिलेनं एका टिव्ही प्रोग्राममध्ये आपल्या या सवयीबद्दल सांगितलं तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. महिलेनं सांगितलं की ती शेजाऱ्यांच्या घराच्या भिंतीही खाते. तिनं सांगितलं की आपल्या आईच्या मृत्यूनंतर ती डिप्रेशनमध्ये (Depression) गेली. यानंतर तिला खडू खाण्याची सवय लागली. हळूहळू तिला भिंतींचा वास आवडू लागला. यानंतर ती भिंतीही खाऊ लागली. निकोलने सांगितलं की तिला वेगवेगळ्या भिंतींची चव आवडते. निकोलच्या म्हणण्यानुसार, आपल्या या सवयीमुळे ती स्वतःच वैतागली आहे. तिनं सांगितलं की आता ती आसपासच्या लोकांच्या घराच्या भिंतीही खाऊ लागली आहे. आता एका आठवड्यात ती तीन फूट भिंत खाते. यामुळे तिच्या घराच्या भिंतीला अनेक बोगदे आहेत. निकोलच्या या सवयीला आसपासचे लोकही वैतागले आहेत. निकोलला एक मुलगाही आहे. डॉक्टरांनी तिला असं न करण्याचा इशाराही दिला आहे. मात्र तिला भिंत खाण्याची इतकी जास्त सवय आहे की ती याकडे दुर्लक्ष करते. डॉक्टरांनी तिला सांगितलं आहे की या सवयीमुळे तिच्या आतड्यांनाही मोठं नुकसान पोहोचू शकतं. ही सवय न सोडल्यास तिच्यासाठी हे जीवघेणंही ठरू शकतं, असंही डॉक्टरांनी तिला सांगितलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: