Home /News /viral /

बाबो! रेकॉर्डच्या नादात तरुणीने फक्त 8 मिनिटांत फस्त केलं आठवडाभराचं खाणं; चॅलेंजचा शेवट काय झाला पाहा VIDEO

बाबो! रेकॉर्डच्या नादात तरुणीने फक्त 8 मिनिटांत फस्त केलं आठवडाभराचं खाणं; चॅलेंजचा शेवट काय झाला पाहा VIDEO

तरुणीने 8 मिनिटांत 8 हजार कॅलरीज घेतल्या जे तिचं वजन आणि वय पाहता तिच्यासाठी आठवडाभर पुरेसं होतं.

    लंडन, 05 जुलै : सोशल मीडियावर बरेच चॅलेंजेस व्हायरल होत असतात. त्यापैकीच एक म्हणजे खाण्याचं चॅलेंज. तसं तुम्हीही प्रत्यक्षात असं चॅलेंज स्वीकारलं असेल. कोण किती जास्त खातं, कोण लवकर खातं असे खाण्याच्यासंबंधी किती तरी चॅलेंजस तुम्ही घेतले असतील. खवय्यांसाठी तर असे चॅलेंज म्हणजे मोठी संधी असते. सध्या असंच इटिंग चॅलेंज स्वीकारणाऱ्या एका फुडी तरुणीचा व्हिडीओ चर्चेत आहे. ज्यात या तरुणी अवघ्या 8 मिनिटांत तब्बल आठवडाभराचं खाणं फस्त केलं आहे (Food eating challenge). यूकेच्या बिर्मिंघममधील लियह शूटकेवेरला (Leah Shutkever) देशातील सर्वात भुक्कड म्हणून तिला ओळखलं जातं. तिने आतापर्यंत 27 वर्ल्ड रेकॉर्ड्स केले आहेत. खाण्याची हौस असलेल्या लियहल आता अशाच आणखी एका चॅलेंजमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. देशातील सर्वात मोठं ब्रेकफास्ट चॅलेंज तिने स्वीकारलं. ज्यात तिने आठवडाभराचं खाणं फक्त 8 मिनिटांत खाल्लं. हे वाचा - अरे हिला आवरा! DJ Dance करताना इतका जोश चढला की...; महिलेचं 'ते' कृत्य कॅमेऱ्यात कैद गेल्या महिन्यात तिने ह्युज ब्रेकफास्टचं चॅलेंज स्वीकारलं. तिच्या ताटात 5 अंडी,  5 सॉसेस,  5 बेकन,  5 टोमॅटो,  5 हॅश ब्राऊन आणि  5 ब्लॅक पुडिंग कप,  5 टोस्ट,  5 बीन्सच्या वाट्या,  5 मशरूमच्या वाट्या यांचा समावेश होता. संपूर्ण ताटात 8 हजार कॅलरीजचे पदार्थ होते. लियहचं वजन आणि वय पाहता तिच्यासाठी 8 हजार कॅलरी आठवडाभराच्या ऊर्जेसाठी पुरेशी आहे. पण तिने एकाच वेळेला इतक्या कॅलरी घेतल्या. हे चॅलेंज पूर्ण करत लियहने दोन आठवड्यांपूर्वीचाच रेकॉर्ड तोडला आहे. याआधी 12 मिनटं 50 सेकंदात इतके पदार्थ खाण्याचा रेकॉर्ड होता. युट्यूबर लियह म्हणाली, याआधीचा रेकॉर्ड इतका जबरदस्त होता की तो तोडण्याचा प्रयत्न करताना तिला भीतीही वाटत होती. हे चॅलेंज खूप भारी होतं. हे वाचा - OMG! आईच्या पोटातून बाहेर आलं असं बाळ; डिलीव्हरी करणारे डॉक्टरही हादरले ज्या कॅफेत लियहने हा रेकॉर्ड केला, त्याचे मालक अली क्लिफ्टन म्हणाले की लियहचा वेग पाहून मी शॉक झालो होता. अगदी शांतपणे फक्त 8 मिनिटांत तिने सर्व खाणं संपवलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral

    पुढील बातम्या