Home /News /viral /

VIDEO - फक्त दोरीउड्या मारून घरबसल्या बक्कळ पैसा कमावते ही तरुणी; नोकरीही सोडली

VIDEO - फक्त दोरीउड्या मारून घरबसल्या बक्कळ पैसा कमावते ही तरुणी; नोकरीही सोडली

तुम्ही दोरीउड्या टाइमपास किंवा एक्सरसाइझसाठी मारत असाल पण याच दोरीउड्या या महिलेला पैसे कमवून देत आहेत.

  मुंबई, 26 एप्रिल : दोरीउड्या मारणं अनेकांना आवडतं. लहान असताना तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत दोरीउड्यांची स्पर्धा लावली असेल. शाळेतही तुम्ही दोरीउड्यांच्या स्पर्धेत भाग घेतला असेल. दोरीच्या उड्या म्हणजे चांगला व्यायाम आहे, त्यामुळे आताही तुम्ही एक्सरसाइझ म्हणून दोरीउड्या मारत असाल. पण या अशआ दोरी उड्या मारून पैसेही कमवता येतात याबाबत तुम्ही कधी ऐकलं आहे का? एक महिला दोरीउड्या मारूनच पैसे कमवते आहे (Woman make skipping rope videos to earn money). 30 वर्षांची लॉरेन फ्लायमॅन (Lauren Flyman) सोशल मीडियावर लॉरेन जम्प्स म्हणून तिला ओळखतात. कारण तिला दोरीउड्या मारण्याची हौस आहे आणि स्किप रोपचे व्हिडीओ ती आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते (Woman skipping videos make her earn lakhs). द सन वेबसाईटच्या रिपोर्टनुसार लॉरेन एका सेल्स कंपनीत काम करायची. पण तिला आपलं काम आवडत नव्हतं. ती पूर्ण दिवस बाहेर असायची. 2020 साली पहिल्या लॉकडाऊनमध्ये तिला अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि ती बेरोजगार झाली. त्यावेळी ती घरीच होती आणि जीमही घरीच करायची. दोरी उड्या मारणं तिला फार कामाचं  वाटत नव्हतं. पण घरी असल्याने ती स्वतःला बिझी ठेवण्यासाठी ती करायची. हे वाचा - OMG! फक्त विचारानेच Fat To Fit केलं, 110 किलोची महिला 59 किलोची झाली; सांगितली Weight Loss Trick पाहता पाहता ती दोरी उड्या मारण्यात एक्सपर्ट झाली. ती वेगवेगळ्या पद्धतीने दोरीच्या उड्या मारू लागली. सोशल मीडियावर तिने आपल्या स्किपिंग रोपच्या व्हिडीओसाठी एक वेगळं अकाऊंट ओपन केलं आणि तिथं आपले हे व्हिडीओ पोस्ट करू लागली.
  तिचे व्हिडीओ खूप प्रसिद्ध होऊ लागले. कित्येक बड्या ब्रँड्सनी तिच्याशी आपले प्रोडक्ट्स विकण्यासाठी संपर्क केला. लॉरेनने या कंपन्यांशी टायअप केलं आणि आता त्यांचं सामान विकून पैसे कमवत आहे. हे वाचा - Shocking! आकाशात एका विमानातून दुसऱ्या विमानात जाण्यासाठी उडी मारली पण...; अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO लॉरेन म्हणाली आधी ती 9-5 नोकरी करायची. पण आता ती दिवसा 6-6 तास दोरीउड्याचे व्हिडीओ बनवते. या कामामुळे तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. हे पैशांची ती चांगली गुंतवणूक करते. यातूनही तिला पैसे मिळतात
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Viral, Viral videos

  पुढील बातम्या