Home /News /viral /

हौशेपोटी महिलेने स्वतःच्या जिभेचे केले दोन तुकडे आणि आता...; Shocking Video

हौशेपोटी महिलेने स्वतःच्या जिभेचे केले दोन तुकडे आणि आता...; Shocking Video

महिलेने आपली जीभ कापून घेतली आणि आता सोशल मीडियावर आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

  वॉशिंग्टन, 17 मे : आपल्या शरीराच्या बाबतीत बहुतेक लोक समाधानी नसता. कुणाला आपलं नाक लहान वाटतं, तर कुणाला मोठं, कुणाला आपले ओठ लहान वाटतात तर कुणाला मोठे, कुणाला आपल्या गालावर डिम्पल हवं असतं, तर कुणाला फॉक्स आय हवे असतात. हे सर्व करण्यासाठी आता कॉस्मेटिक आणि प्लॅस्टिक सर्जरीचाही पर्याय उपलब्ध आहे. अशी बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील ज्यांनी अशा सर्जरीद्वारे आपल्या शरीराचा एखादा अवयव आपल्याला हवा तसा करवून घेतला आहे. पण एक महिला तर याच्याही पुढे गेली. तिने तर चक्क आपल्या जिभेचा आकारही बदलून घेतला आहे (Woman divides tongue). नाक, ओठ, डोळे याचा विचार जितका लोक करतात तितका जिभेचा फार करत नाही. म्हणजे जीभ ही तोंडाच्या आत येते. त्यामुळे तसा तिचा सौंदर्यात काही अडसर येत नाही. पण आपल्या शरीरात वेगवेगळे बदल करण्याची हौस असलेल्या अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणाऱ्या ब्रायना मॅरी शिहादेह मात्र जिभेचा आकार बदलण्यापासूनही स्वतःला रोखू शकली नाही. तिने आपल्या जिभेचे दोन तुकडे केले. ऑपरेशनमार्फत आपल्या जिभेचे दोन भाग तिने करवून घेतले. हे वाचा - धक्कादायक! हॉस्पिटलमध्ये उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा; पापणीचे झाले 2 तुकडे आता तिची जीभ सापाच्या जिभेसारखी दिसते. अशा जिभेमार्फत आपण काय करू शकतो हेसुद्धा तिने दाखवलं आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओही पोस्ट केला आहे. ज्यात ती एकाच वेळी आपल्या या डिव्हाइडेड जिभेने दोन ड्रिंक पिताना दिसते. अशा जिभेमुळे आपण एकाच वेळी दोन दोन वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखू शकतो, याचा आनंद होत असल्याचं ती सांगते.
  तज्ज्ञांच्या मते, जिभेचे दोन भाग करणं हे खतरनाक आहे. यामुळे ब्रेन हॅमरेज, इन्फेक्शन होऊ शकतं. नसांना हानी पोहोचू शकते. त्यामुळे असा प्रयत्न तुम्ही करू नका.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Lifestyle, Viral, Viral videos

  पुढील बातम्या