मराठी बातम्या /बातम्या /Viral /

अति तिथे माती! तोंडभरुन केक खाल्ल्याने महिलेचा गुदमरुन मृत्यू

अति तिथे माती! तोंडभरुन केक खाल्ल्याने महिलेचा गुदमरुन मृत्यू

केकने घेतला 60 वर्षीय महिलेचा जीव. ऑस्ट्रेलियामध्ये केक खाण्याच्या स्पर्धेत घडला धक्कादायक प्रकार,

केकने घेतला 60 वर्षीय महिलेचा जीव. ऑस्ट्रेलियामध्ये केक खाण्याच्या स्पर्धेत घडला धक्कादायक प्रकार,

केकने घेतला 60 वर्षीय महिलेचा जीव. ऑस्ट्रेलियामध्ये केक खाण्याच्या स्पर्धेत घडला धक्कादायक प्रकार,

  • Published by:  Priyanka Gawde

क्विन्सलॅंड, 31 जानेवारी : केक हा खरतर सर्वांच्या आवडीचा पदार्थ. वाढदिवस असो किंवा नसो केक खाण्यासाठी लहागण्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच तयार असतात. पण कधी केक खाल्यामुळं कोणाचा मृत्यू झाला आहे, असे ऐकले आहे का? असा धक्कादायक प्रकार ऑस्ट्रेलियात घडला आहे. गोड पदार्थ खाण्याच्या स्पर्धेत हा सगळा धक्कादायक प्रकार घडला.

या स्पर्धेतच तोंड भरुन केक खाल्ल्याने एका 60 वर्षीय महिलेचा श्वास गुदमरुन मृत्यू झाला आहे. ही घटना ऑस्ट्रेलिया (Australia) देशातील क्विन्सलॅंड (Queensland) शहरात घडली. ऑस्ट्रेलिया डे (Australia Day 2020) निमित्त एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात जास्तीत जास्त मिठाई खाण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 60 वर्षीय महिलेने सहभाग घेतला होता. मात्र तोंड भरून केक खाल्याने या महिलेचा श्वास कोंडून मृत्यू झाला. दरम्यान आयोजकांनी या महिलेला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.

वाचा-काय म्हणावं याला! वडिलांकडे 98 कोटींची संपत्ती अन् मुलगा राहतोय भाड्याच्या घरात

वाचा-दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे! 0 डिग्रीत नवरदेव चालत पोहचला लग्न मंडपात

वाचा-पाळीव कुत्र्याने चिमुरड्याचा पकडला पाय, जमावाने काठी दगडांने बेदम मारलं पण..

वाचा-हटके नंबर प्लेट असलेल्या ‘खानसाहब’ची पुणे पोलिसांनी उतरवली मस्ती, ट्वीट VIRAL

दरम्यान, ही घटना ज्या हॉटेलमध्ये घडली त्या हॉटेलने आपल्या फेसबुक पेजवर या महिलेप्रती एक पोस्ट टाकण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जास्तीत जास्त खाण्याच्या स्पर्धा नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या वेळीही ऑस्ट्रेलिया डे निमित्त अनेक हॉटेल्समध्ये अधिक खाण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या दिवशी ऑस्ट्रेलियात आलेल्या पहिल्या युरोपीयन लोकांचे स्मरण केले जाते. मात्र महिलेच्या मृत्यूमुळे या स्पर्धेला गालबोट लागले.

First published: