Home /News /viral /

महिलेने पबमध्ये केलं असं भयानक कृत्य; वेटरही पळाला, CCTV कॅमेऱ्यात कैद!

महिलेने पबमध्ये केलं असं भयानक कृत्य; वेटरही पळाला, CCTV कॅमेऱ्यात कैद!

आता स्टाफ मेंबर पबमध्ये एकटं काम करायला घाबरत आहेत.

    नवी दिल्ली, 20 जानेवारी : ब्रिटेनमधील एका रेस्टॉरंटमध्ये विचित्र प्रकार समोर आल्यानंतर मालकांनाही धक्का बसला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या गोष्टीचा खुलासा झाला आहे. व्हिडीओमध्ये (Shocking Video) दिसून येत आहे की, एक महिला पबच्या आत आपल्या हातात चमचा घेऊन बराच वेळ पाहत होती. यादरम्यान स्टाफ मेंबरदेखील तेथे उभा होता. मात्र चमचा हातात ठेवलेला असताना अचानक तो हातातच गोल फिरला आणि खाली पडला. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. (woman did such a dangerous thing sitting in the pub the waiter ran away Incident captured on CCTV) बहिणींनी पबमध्ये भूत असल्याची आशंका.. मिळालेल्या माहितीनुसार, डार्लिंगटनच्या मोरपेथमधील 'द ब्लॅक एंड ग्रे' पब सांभाळणाऱ्या बहिणी रिचेल स्टॉक्स आणि एशले नाइस्बिट यांनी आपल्या रेस्टॉरंटमध्ये विचित्र गोष्टी पाहिल्यानंतर पोलिसांना फोन केला. पबमध्ये विचित्र घटना घडत होत्या. त्यापैकी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये महिलेच्या तळहातावरील चमचा जागेवरच फिरल्याचं पाहिलं जात आहे. हे ही वाचा-बापरे! चक्क 2 सिंहांसमोर छाती ताणत लढायला गेला तरुण आणि...; थरकाप उडवणारा VIDEO ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या पबमधील स्टाफ मेंबर आता येथे एकटे असताना काम करण्यास घाबरतो. सप्टेंबर 2021 मध्ये दोघी बहिणी पबमध्ये वर बसल्या होत्या. यावेळी त्यांना खाली काहीतरी जोरात आदळल्याचा आवाज आला. पोलिसांना यावेळी कोणतेही पुरावे मिळाले नाही. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांना माणसाची छाया दिसली, जे पाहून त्यांना धक्काच बसला. रिचेलने सांगितलं की, आम्ही पबच्या वरच्या अपार्टमेंटमध्ये राहतो. त्या दिवशी रात्री काहीतरी भयंकर आवाज येत होते. जमिनीवर काहीतरी आदळल्याचा आवाज होता. मात्र जेव्हा पोलीस पबमध्ये गेले तर त्यांना काहीच दिसलं नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र एक माणसाची छाया दिसली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Britain, Shocking video viral

    पुढील बातम्या