सोफिया 04 डिसेंबर : काहीतरी वेगळं करण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. असंच काहीसं बुल्गारियामध्ये राहणाऱ्या एका तरुणीच्या बाबतीतही घडलं. जगात सर्वात मोठे ओठ (Biggest Lips in The World) आपले असावे यासाठी तिने कित्येक वेळा ओठांची सर्जरी (Lips Surgery) केली. मात्र, अजूनही ती समाधानी नाही. ख्रिसमसच्या आधी ती आणखी एक सर्जरी करून घेणार आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, 24 वर्षीय अँड्रिया इवानोवाचा असा दावा आहे की तिचे ओठ जगात सर्वाधिक मोठे आहेत. मात्र आपल्या पाउटचा आकार आणखी मोठा व्हावा अशी तिची इच्छा आहे. यासाठी तिने 27 वेळा सर्जरी करून घेतली आहे. इवानोवाची इच्छा Bratz Doll प्रमाणे दिसण्याची आहे. यासाठी आणखी एक सर्जरी करायलाही ती तयार आहे. मागील वर्षी 28 एप्रिललाही तिने एक सर्जरी केली होती. यातून 26 व्या वेळी तिच्या ओठांमध्ये हायल्यूरोनिक अॅसिड (Hyaluronic Acid) टाकण्यात आलं होतं.
सर्जरीच्या मदतीने तिने आपल्या ओठांचा आकार भरपूर वाढवून घेतला आहे आणि ती जगातील सर्वात मोठे ओठ असलेली महिला बनली आहे. तिने आपल्या Chin आणि Jawline च्या सर्जरीसाठीही भरपूर खर्च केला आहे. नुकतंच तिने यासाठी तब्बल 50 हजार रुपये खर्च केले. अँड्रियाची अशी इच्छा आहे की तिच्या शरीराचा प्रत्येक भाग परफेक्ट असावा. यासाठीच ती सतत सर्जरी करून घेत असते.
अँड्रिया इवानोवा सोशल मीडियावर भरपूर सक्रीय आहे. तिचे अनेक फॉलोअर्स तिला यासाठी सपोर्टही करतात. इतकंच नाही तर काहींनी सर्जरीसाठी तिला आर्थिक मदतीची ऑफरही दिली आहे. आपले ओठ मोठे करून घेण्यासाठी तिने आतापर्यंत अनेक इंजेक्शन घेतले आहेत. तिला खर्चाची अजिबातही काळजी नाही. तिने म्हटलं की मोठे ओठ माझा आत्मविश्वास वाढवतात. यासाठी मी काहीही करायला तयार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Surgery, Viral news