Home /News /viral /

अरे हिला आवरा! DJ Dance करताना इतका जोश चढला की...; महिलेचं 'ते' कृत्य कॅमेऱ्यात कैद

अरे हिला आवरा! DJ Dance करताना इतका जोश चढला की...; महिलेचं 'ते' कृत्य कॅमेऱ्यात कैद

डीजेवर बेभान होऊन डान्स करणाऱ्या महिलेने असं काही केलं की पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

  मुंबई, 05 जुलै : गाणं लागलं की अनेकांचं शरीर थिरकू लागतं. विशेषतः डीजे वाजू लागला की कित्येकांच्या अंगातच येतं. नाचता नाचता काही लोक इतके आऊट ऑफ कंट्रोल होतात की ते नेमकं काय करत आहेत, याचं भानही त्यांना राहत नाही (Funny dance video viral). असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात एका महिलेने डान्स करताना असं काही केलं की पाहून तुम्हीही हैराण व्हाल (Woman dance on DJ). डीजे वाजताच महिलेच्या अंगात वारं संचारलं आणि तुफानी डान्स करू लागली. नाचता नाचता तिने जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तिच्यासोबत डान्स करणारेही आपला डान्स थांबवून तिच्याकडेच पाहत होते. त आता असं या महिलेने नेमकं केलं तरी काय हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. हे वाचा - वडील शेवटच्या घटका मोजत असतानाच लेकीचं रुग्णालयात धक्कादायक कृत्य; तरीही होतंय कौतुक व्हिडीओत पाहू शकता डीजे वाजतो आहे आणि बरेच लोक नातच आहेत. महिला, लहान मुलं-मुली नाचताना दिसत आहेत. निळ्या रंगाची साडी नेसलेल्या महिलेकडे तुम्ही नीट पाहा. ती बेभान होऊन नाचते आहे. आजूबाजूला असलेल्या लोकांकडेही तिचं लक्ष नाही. सुरुवातीला एक महिलाही तिच्यासोबत नाचत असते पण तिचं रूप पाहून तीसुद्धा नाचायची थांबून बाजूला होती. एक लहान मुलगीही तिच्याकडे पाहतच राहते.
  नाचत नाचत महिला तिच्या जवळ असलेल्या एका मुलाला धक्का देते. तरी मुलगा नाचतो. त्यानंतर ती त्याला ढकलूनच देते आणि स्वतः मात्र आपण काहीच केलं नाही किंवा काहीच झालं नाही असा आव आणत नाचत राहते. मुलगाही तिच्याकडे पाहत राहतो. हे वाचा - बापरे! शेकडो फूट उंचावर चिमुकलीचा Dangerous Stunt; काळजाचा ठोका चुकवणारा Video महिलेचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. जो तुफान व्हायरल होतो आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पाहताना त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींनी तर आपल्या मित्रमैत्रिणींनाही हा व्हिडीओ टॅग केला आहे. असा डान्स करणारे तुमच्याही ओळखीत कुणी असेल तर त्याला ही बातमी नक्की टॅग करा आणि शेअर करा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Dance video, Viral, Viral videos

  पुढील बातम्या