मराठी बातम्या /बातम्या /Viral /

गेली 41 वर्षे फक्त लिंबू पाण्यावरच जगतेय ही महिला, कारण वाचून व्हाल चकित

गेली 41 वर्षे फक्त लिंबू पाण्यावरच जगतेय ही महिला, कारण वाचून व्हाल चकित

महिलेचा दावा आहे की तिने वयाच्या 22 व्या वर्षापासून सॉलिड फूड खाणं बंद केलंय आणि ती फक्त लिंबूपाण्यावर जीवन जगत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा तिच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम दिसून आलेला नाही.

महिलेचा दावा आहे की तिने वयाच्या 22 व्या वर्षापासून सॉलिड फूड खाणं बंद केलंय आणि ती फक्त लिंबूपाण्यावर जीवन जगत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा तिच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम दिसून आलेला नाही.

महिलेचा दावा आहे की तिने वयाच्या 22 व्या वर्षापासून सॉलिड फूड खाणं बंद केलंय आणि ती फक्त लिंबूपाण्यावर जीवन जगत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा तिच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम दिसून आलेला नाही.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lanja, India

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : जगात विविध प्रकारचे लोक आहेत आणि ते त्यांच्या विचारांनुसार जीवन जगतात. व्हिएतनाममधील एक महिलाही अशीच लाइफस्टाइल जगत आहे. गेल्या 41 वर्षांपासून आपण अन्न खाल्लेलं नाही, फक्त पाण्यात काही पदार्थ टाकून ते पाणी पिऊन जगत असल्याचा दावा एका महिलेने केला आहे.

महिलेचा दावा आहे की तिने वयाच्या 22 व्या वर्षापासून सॉलिड फूड खाणं बंद केलंय आणि ती फक्त लिंबूपाण्यावर जीवन जगत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा तिच्या आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम दिसून आलेला नाही. ऑडिटी सेंट्रल वेबसाइटनुसार, प्रामुख्याने उन्हाळ्यात प्यायलं जाणारं लिंबूपाणी हे पेयच तिचा मुख्य आहार आहे आणि याच्या मदतीने ती तिच्या शरीराला सर्व पोषक तत्त्वं देत आहे. हे ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसला असेल किंवा विचित्र वाटलं असेल पण हे सत्य आहे.

हे वाचा - सायनस इन्फेक्शनमुळे खूप त्रास होतोय? ‘हे’ 5 घरगुती उपाय करून पाहा

अन्न सोडल्यानंतरही निरोगी आहे महिला

मिस नगॉन नावाची एक महिला 63 वर्षांची आहे, परंतु ती तिच्या वयानुसार अगदी तंदुरुस्त आणि निरोगी दिसते. तिच्यामध्ये एनर्जी किंवा उत्साहाची कमी जाणवत नाही. ती विविध प्रकारची योगासनं करते, जी तिला तिच्या वयापेक्षा खूपच लहान दिसण्यात मदत करतात. अन्न म्हणून गेल्या 41 वर्षांपासून पाण्यात फक्त काही ग्रॅम मीठ, साखर आणि लिंबाचा रस टाकून पाणी पित असल्याचा तिचा दावा आहे. वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत ती भात आणि इतर सॉलिड फूड खात होती, पण तिला पोटाचा त्रास आणि दृष्टी अंधुक होण्याचा त्रास होऊ लागला. तपासणीत तिला रक्ताचा आजार असल्याचं निष्पन्न झालं. यासाठी तिने अनेक औषधोपचार घेतले, पण काहीच फरक पडला नाही. नंतर तिने अन्नाचं सेवन करणं सोडून दिलं आणि लिंबूपाणी प्यायला सुरुवात केली.

हे वाचा - भोपळ्याच्या बियांचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे, आजच करा आहारात समावेश

शरीराच्या सर्व समस्या झाल्या दूर

महिलेचा दावा आहे की, तिने अन्नाचं सेवन करणं सोडलं आणि फक्त लिंबूपाणी प्यायला लागली आणि तिला त्याचे खूप सकारात्मक परिणाम दिसले. तिचे डोळे तर चांगले झालेच पण तिचा आजारही बरा होऊ लागला. तिने हे एका डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरू केल्याचा खुलासा केला. पण त्या डॉक्टरचे नाव सांगू शकत नाही, कारण ही पद्धत पूर्णपणे अवैज्ञानिक आहे, त्यामुळे त्याला आपले नाव जगासमोर आणायचे नाही, अशी माहिती तिने दिली. या लाइफस्टाइलमुळे ही महिला फार काळ जगू शकणार नाही, असं तिच्या घरातील लोकांना वाटायचं. पण असं काहीच घडलं नाही, उलट त्याचे सकारात्मक परिणाम या महिलेल्या आरोग्यावर झाले. तिचे सर्व आजार बरे झाले आणि आता ती निरोगी आयुष्य जगत आहे. ही महिला लोकांना योगा आणि निरोगी लाइफस्टाइलबद्दल सांगत असते.

First published:

Tags: Lifestyle, Personal life