Home /News /viral /

अनेक शस्त्रक्रिया अन् बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर पुरुष बनली तरुणी; आता पुन्हा शस्त्रक्रिया करून बनली महिला, सांगितलं कारण

अनेक शस्त्रक्रिया अन् बऱ्याच वर्षांच्या मेहनतीनंतर पुरुष बनली तरुणी; आता पुन्हा शस्त्रक्रिया करून बनली महिला, सांगितलं कारण

एका महिलेला आधी पुरुष व्हायचं होतं. यासाठी तिने शस्त्रक्रिया (Sex Reassignment Surgery) करून घेतली. अनेक शस्त्रक्रिया करून बऱ्याच वर्षांनी ती पुरुष बनली. मात्रा आता तिला पुन्हा स्त्री व्हायचं आहे.

    वॉशिंग्टन 12 मे : आज मेडिकल सायन्समुळे (Medical Science) जवळजवळ काहीही शक्य झालं आहे. आता स्त्रीही पुरुष बनू शकते आणि पुरुषालाही स्त्री बनवता येतं. याची एक प्रक्रिया आहे. सध्या अमेरिकेतून अशीच एक बातमी समोर आली आहे, यात एका महिलेला आधी पुरुष व्हायचं होतं. यासाठी तिने शस्त्रक्रिया (Sex Reassignment Surgery) करून घेतली. अनेक शस्त्रक्रिया करून बऱ्याच वर्षांनी ती पुरुष बनली. मात्रा आता तिला पुन्हा स्त्री व्हायचं आहे. आज आम्ही तुम्हाला या महिलेची कहाणी सांगणार आहोत, की तिने इतका मोठा निर्णय का घेतला आणि हे करताना तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आणि आता तिचा प्लॅन काय आहे. आलिया इस्माईल असं या महिलेचं नाव आहे. ती अमेरिकेतील मिशिगनची रहिवासी आहे. सहा वर्षांच्या कठीण प्रक्रियेनंतर ती स्त्रीपासून पुरुष बनली. मात्र आता तिला पुन्हा स्त्री व्हायचं आहे. ती हे करणार आहे, कारण आता तिला वाटतं की तिची नवी ओळख तिला न्याय देत नाहीये आणि तिच्या व्यक्तिमत्त्वापेक्षा वेगळी आहे. 'झोपाळू' गावामुळे संशोधकही अचंबित; येथे चालता-चालता झोपतात लोक; कारण... आलियाला वयाच्या १८ व्या वर्षी समजलं की ती तिच्या शरीरात कम्फर्टेबल नाही. ती पुरुषासारखी जगू लागली, तसे कपडे घालू लागली. वयाच्या 20 व्या वर्षी तिने आपल्या शरीरात मेडिकलच्या मदतीने बदल करून घेण्यास सुरुवात केली. तिने हार्मोन्स घेण्यास सुरुवात केली जेणेकरून तिच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची (पुरुषांच्या शरीरात तयार होणारे सेक्स हार्मोन) पातळी वाढेल. वयाच्या 27 व्या वर्षी तिने कायदेशीररित्या आपलं नाव बदललं. तिने आपलं नाव बदलून इसा ठेवलं. ऑगस्ट 2015 मध्ये तिने पुन्हा दुहेरी शस्त्रक्रिया केली. हळूहळू ती पुरुष बनली होती. मात्र यानंतर तिला जाणवायला लागलं की तिला पुरुषाच्या शरीरात राहून ती सहजता जाणवत नाहीये. फेब्रुवारी २०२१ मध्ये तिने पुरुषांचे हार्मोन्स घेणं पूर्णपणे बंद केलं आणि पुन्हा आपली जुनी ओळख परत मिळवण्याचा निर्धार केला. म्हणजेच आता तिने पुरुषापासून पुन्हा स्त्री बनण्याचा निर्धार केला होता. तिने सांगितलं की, 'जेव्हा मी पहिल्यांदा समलिंगी म्हणून माझ्या कुटुंबासमोर आले, तेव्हा त्यांनाही हे अगदी सहज स्वीकार केलं. आई माझ्या भावना समजून घेत होती.' 'बॉडी स्प्रे'च्या वासामुळे अल्पवयीन मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू? ती म्हणते, 'माझ्या आयुष्यातील हा काळ मला बरंच काही शिकवणारा होता. यातूनच मला स्वतःची ओळख पटली. या काळात माझ्या कुटुंबीयांनीही माझी साथ दिली. त्यांना माहिती होतं की मी आयुष्यात वेगळ्या रस्त्यावर चालण्यास सक्षम आहे आणि त्यांना माझ्या सत्याचा अभिमान आहे. आता मी हार्मोन्स घेणं बंद केलं आहे. आता यापुढे माझा काहीही करण्याचा विचार नाही. पण मला माहीत आहे की भविष्यात बऱ्याच गोष्टी बदलतील.' आलियाचं म्हणणं आहे की, अनेकांनी आपल्या लिंग बदलाबाबत आणि लिंगाशी संबंधित ओळखीबाबतच्या समस्या तिच्याशी शेअर केल्या आहेत. यावर आपलं मत मांडायला ती कधीच मागेपुढे पाहत नाही. स्वत:वर आणि आपल्या माणसांवर विश्वास ठेवला, की आयुष्यात अनेक अवघड रस्ते आपोआपच सोपे होऊन जातात, असं ती म्हणते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Surgery, Transgender

    पुढील बातम्या