संचारबंदी असतानाही बाहेर फिरण्यासाठी पतीला बनवलं श्वान, नेमका काय आहे अजब प्रकार वाचा

संचारबंदी असतानाही बाहेर फिरण्यासाठी पतीला बनवलं श्वान, नेमका काय आहे अजब प्रकार वाचा

आठ वाजता संचारबंदी लागू झाल्यानंतर तासाभरानं रात्री नऊच्या सुमारास पोलिसांना एक महिला रस्त्यावर फिरताना दिसली. तिच्याबरोबर तिचा पतीही होता

  • Share this:

कॅनडा, 13 जानेवारी: कॅनडात कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट वेगानं पसरत असून तिथं दररोज हजारोंच्या संख्येनं  नवे कोरोनाबाधित आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तिथं लॉकडाउनची मुदत वाढवण्यासह संचारबंदी लागू करण्यात येत आहे. कॅनडामधील क्युबेक प्रांताचे प्रीमियर फ्रेंकॉइस लेगाल्ट यांनी इथं रात्री 8 वाजल्यापासून सकाळी पाचपर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तिथंही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र संचारबंदी किंवा इतर कोणतेही नियम लागू केले की त्याचं उल्लंघन करण्यात काही लोकांना मोठा आनंद मिळत असतो, ही मानवी प्रवृत्ती जगभर सर्वत्र सारखीच असल्याचं तिथल्या एका घटनेवरून स्पष्ट झालं आहे. शनिवारी 9 जानेवारी रोजी रात्री संचारबंदी दरम्यान क्युबेक प्रांतात एक अतिशय विचित्र घटना निदर्शनास आली. त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

क्यूबेकमध्ये रात्री आठ वाजता संचारबंदी लागू झाल्यानंतर तासाभरानं रात्री नऊच्या सुमारास पोलिसांना एक महिला रस्त्यावर फिरताना दिसली. तिच्याबरोबर तिचा पतीही होता; पण त्याला ती चक्क कुत्र्यासारखं गळ्यात पट्टा बांधून, तो आपल्या हातात पकडून आपल्याबरोबर चालवत होती. हे दृश्य बघून पोलिसही अचंबित झाले.

पोलिसांनी तिला संचारबंदी असताना घराबाहेर पडण्याचं कारण विचारलं असता, तिनं संचारबंदीत  घराबाहेर एक किलोमीटरच्या अंतरापर्यंत कुत्र्यांना फिरवण्यास परवानगी असल्याचं सांगितलं. तेव्हा पोलिसांनी तिचा नवरा म्हणजे कुत्रा नसल्याचं निदर्शनास आणलं. त्यावर त्या महिलेनं तीव्र निषेध व्यक्त केला. पोलिसांनी नियमाचं उल्लंघन केल्याबद्दल त्यांना दंड भरावा लागेल, असं सांगितल्यावर त्या महिलेनं त्यालाही नकार दिला, मात्र पोलिसांनी या दोघांना प्रत्येकी 1500 डॉलर्सचा म्हणजेच एक लाख 9 हजार 934 रुपयांचा दंड ठोठावला.

हे वाचा- अपंग असली तरी घाबरली नाही, हिम्मतीनं भिडली, एका हातानं परतवला वाघाचा हल्ला

क्युबेकमध्ये सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा झपाट्यानं प्रसार होत असून, दररोज दोन अडीच हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळं येत्या काही आठवड्यात रूग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, क्युबेकमध्ये शनिवारपासून संचारबंदी लागू केली असून, लॉकडाउनची मुदत 8 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. संचारबंदी दरम्यान, जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले असून, लोकांना घरगुती कार्यक्रमसुद्धा करण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि इथली आरोग्य व्यवस्था कार्यक्षम करण्यासाठी अशी शॉक ट्रीटमेंट करणं आवश्यक ठरल्याचं या प्रांताचे प्रीमियर फ्रेंकोइस लेगाल्ट यांनी बुधवारी सांगितलं. या काळात शाळा मात्र सुरू राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि कोविड 19ची रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी तिथं लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत आहे. क्युबेकमध्येही लसीकरण मोहिमेची गती वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून, यात ओटावा प्रांत मदत करेल, असं आश्वासन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी दिलं आहे.

First published: January 13, 2021, 4:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading