मराठी बातम्या /बातम्या /Viral /

शिवीगाळ करत महिलेची सुरक्षा रक्षकाला मारहाण; VIDEO समोर आल्यावर अटक झाली पण...

शिवीगाळ करत महिलेची सुरक्षा रक्षकाला मारहाण; VIDEO समोर आल्यावर अटक झाली पण...

या महिलेनं गेट उघडण्यास उशीर केल्याबद्दल सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. (Woman Slapping Security Guard)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Noida, India
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 11 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी नोएडात एका महिलेच्या व्हिडिओची बरीच चर्चा होती, ज्यामध्ये ही महिला शिवीगाळ करताना दिसत होती. आता नोएडामधूनच आणखी एका महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. या महिलेनं गेट उघडण्यास उशीर केल्याबद्दल सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं.

क्षणभरात मृत्यूच्या दारात पोहोचले; हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही पार्लर-सलूनमध्ये जाताना 10 वेळा विचार कराल

ही घटना फेज-3 कोतवाली परिसरातील Cleo County सोसायटीमधील असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपी महिला सुदिप्ता दासविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती, तिला जामीनही मिळाला आहे. ही महिला प्राध्यापक असल्याचं सांगण्यात येत आहे.

याआधी नोएडातील एका शिवीगाळ करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली. हा व्हिडिओ नोएडाच्या ठाणा सेक्टर-126 परिसरातील हाय राइजसोसायटी जेपी विशटाउन इथला होता. यात भव्या रॉय नावाच्या 32 वर्षीय महिलेने सुरक्षारक्षकाला शिवीगाळ केली होती. ती गार्डसोबत झटापट करतानाही दिसली होती.

मृत्यूला जवळून पाहिलं! दैव बलवत्तर म्हणून 'तो' असा वाचला, पाहा थरारक VIDEO

भव्य रॉय दिल्लीच्या साकेत कोर्टात प्रॅक्टिस करते. ती सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक 901 मध्ये भाड्याने राहते. ज्या सुरक्षा रक्षकासोबत भव्या रॉयने गैरवर्तन केले, ते अनूप कुमार यांनी सांगितलं की, ते गेटवर कार तपासत होते. त्यांनी सांगितलं की एक कार आधीच गेटवर उभा होती, त्यामुळे ते या महिलेकडे गेले आणि थोडा वेळ लागेल असं सांगितलं. यावर ती भडकली आणि गाडीतून खाली उतरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली.

First published:

Tags: Crime news, Shocking video viral