• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पत्नीनं घरात लावला सिक्रेट कॅमेरा; पतीला मैत्रिणीसोबत भलत्याच अवस्थेत पाहून पुरती हादरली

पत्नीनं घरात लावला सिक्रेट कॅमेरा; पतीला मैत्रिणीसोबत भलत्याच अवस्थेत पाहून पुरती हादरली

शौनाने सिक्रेट कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या मैत्रिणीला आणि पतीला रंगेहाथ पकडलं. यानंतर तिनं आणखी एक व्हिडिओ बनवला.

 • Share this:
  नवी दिल्ली 13 नोव्हेंबर : एका पत्नीनं आपल्याच मैत्रिणीसोबत संबंध ठेवणाऱ्या आपल्या पतीला रंगेहाथ पकडलं (Woman Caught her Cheater Husband with Best Friend) आहे. यासाठी पत्नीने एक सिक्रेट कॅमेरा लावला होता. विशेष बाब म्हणजे पत्नीने आपल्यासोबतच्या पती आणि बेस्ट फ्रेंडच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Video on Social Media) शेअर केला. या व्हिडिओ तब्बल 9 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ‘अखियां मिलाऊं कभी..’ गाण्यावर एअर होस्टेसचे जोरदार ठुमके; VIDEO चा धुमाकूळ टिकटॉकवर शौना नावाच्या महिलेनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. शौनानं सांगितलं, की मी घरात यासाठी कॅमेरा लावला कारण मी डिस्टर्ब होते. आम्ही चार वर्षांपासून मैत्रिणी आहोत. खूप चांगल्या मैत्रिणी. शौनाने सिक्रेट कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या मैत्रिणीला आणि पतीला रंगेहाथ पकडलं. यानंतर तिनं आणखी एक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये शौनाने आपल्या बेस्ट फ्रेंडला विचारलं की जेव्हा मी कामावर जायचे तेव्हा तू माझ्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवायची का? हा की नाही? जेव्हा मी कामावर जायचे तेव्हा तू त्याच्यासोबत असायची का? यावर तिची मैत्रिण उत्तर देते की मी तुझ्या पतीसोबत संबंध का ठेवेल. इतक्यात शौनाचा पती येतो आणि तो जोरजोरात ओरडू लागतो. हा व्हिडिओ आतापर्यंत 9.1 मिलियनहून अधिकांनी पाहिला आहे आणि व्हिडिओला 1.1 मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओआधी आणखी एक व्हिडिओ शेअर केला गेला होता. याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेलं, जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणीला स्वतःच्या घरात राहण्यासाठी जागा देता आणि तुम्ही कामासाठी बाहेर असताना ती तुमच्या पतीसोबत शारीरिक संबंध ठेवते. कारण तिला हे माहिती नसतं की घरात सिक्रेट कॅमेरा लावण्यात आला आहे. Yuck!पाउचमधून Tomato Sauce काढत होती तरुणी,बाहेर जे काही आलं ते पाहून बसला धक्का हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, आपल्याच घरात आपल्या पतीसोबत इतर महिलेला कधीच राहू देऊ नका. आणखी एकाने सल्ला दिला की कधीही तिसऱ्या व्यक्तीला आपल्या घरात आणू नका. तुमचा त्यांच्यावर कितीही विश्वास असला तरीही.
  Published by:Kiran Pharate
  First published: