Home /News /viral /

मैत्रिणीच्या बाळाचं डायपर बदलताना समोर आलं भयंकर सत्य; समजताच महिलेनं पतीला दिला घटस्फोट

मैत्रिणीच्या बाळाचं डायपर बदलताना समोर आलं भयंकर सत्य; समजताच महिलेनं पतीला दिला घटस्फोट

नवजात बाळाचं डायपर बदलताना महिलेनं त्याच्या शरीरावर अगदी तसंच बर्थमार्क पाहिलं, जे तिच्या पतीच्या आणि मुलाच्या शरीरावर होतं. हे पाहून काही वेळासाठी महिला गोंधळात पडली

    नवी दिल्ली 30 ऑक्टोबर : मैत्री हे एक असं नातं असतं ज्यात कोणतीही पर्वा न करता एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातात. मात्र, या नात्यात जर फसवणूक (Cheating in Friendship) झाली तर समोरचा माणूस पूर्णपणे खचून जातो. एक महिलेसोबत असंच घडलं. तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीनेच तिची फसणूक केली (Affair With Best Friend’s Husband) . मैत्रिणीला बाळ झाल्यानंतर तिच्या मदतीसाठी गेलेल्या महिलेला समजलं की तिचा पती आणि मैत्रिणीत इतकं जवळंच नातं निर्माण झालं की त्यांनी एका बाळाला जन्म दिला. मुलींनी दुसऱ्या महिलेसोबत बापाला पकडलं रंगेहाथ; बेदम मारहाणीचा Video आला समोर 4 मुलांची आई असलेल्या या महिलेला याबाबत तेव्हा समजलं जेव्हा ती आपल्या मैत्रिणीच्या डिलिवरीनंतर तिच्या मदतीसाठी तिच्याच घरी थांबली होती. नवजात बाळाचं डायपर बदलताना महिलेनं त्याच्या शरीरावर अगदी तसंच बर्थमार्क पाहिलं, जे तिच्या पतीच्या आणि मुलाच्या शरीरावर होतं. हे पाहून काही वेळासाठी महिला गोंधळात पडली आणि मग तिनं डोकं लावलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, महिलेनं स्वतःच आपल्या मैत्रिणीला म्हटलं होतं की ती तिच्या मदतीसाठी थांबेल आणि प्रेग्नंसीदरम्यान तिची मदत करेल. मात्र, मैत्रिणीच्या बाळाच्या शरीरावर तिला दोन तसेच बर्थमार्क (Birthmark on Body) दिसले, जसे तिच्या मुलाच्या शरीरावर दिसले होते. हे निशाण बाळाला आपल्या पित्याकडून अनुवंशिकच मिळाले होते. यामुळे हे बर्थमार्क दिसताच तिला जाणवलं की तिच्या मैत्रिणीचं हे बाळ तिच्याच पतीपासून झालं आहे. या नवजात बाळाच्या मानेवरही अगदी तसंच बर्थमार्क होतं, जसं या महिलेच्या मुलांच्या मानेवर होतं. 'हम दिल दे चुके सनम'! पतीनं प्रियकरासोबत लावलं पत्नीचं लग्न, वाचा लव्ह स्टोरी TikTok Video च्या माध्यमातून याबाबत माहिती देताना महिलेनं म्हटलं की जेव्हा तिनं हे बर्थमार्क पाहिलं तेव्हा तिची मैत्रिणही जवळच होती. आम्ही एकमेकींकडे पाहिलं आणि मी घरातून बाहेर निघून गेले. मात्र, याआधीच महिलेच्या मैत्रिणीनं हे मान्य केलं की हे बाळ तिच्या पतीचं आहे. महिलेच्या पतीनं ६-७ महिन्यांनंतर ही बाब मान्य केली आणि ते दोघंही वेगळे झाले. महिलेनं म्हटलं, की हे सगळं होऊनही तिनं आपल्या मैत्रिणीसोबतचे संबंध तोडले नाहीत कारण तिची मुलगी आणि माझी मुलं बहीण-भाऊ आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Shocking news

    पुढील बातम्या