Home /News /viral /

कारमध्ये सापडलेल्या त्या वस्तूमुळे फुटलं धोका देणाऱ्या पतीचं बिंग; पत्नीने विचित्र पद्धतीने घेतला बदला

कारमध्ये सापडलेल्या त्या वस्तूमुळे फुटलं धोका देणाऱ्या पतीचं बिंग; पत्नीने विचित्र पद्धतीने घेतला बदला

कारमध्ये कंडोम (Condom in Car) आढळल्यापासून तिला पतीवर संशय होता आणि ती सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होती. ती असा काहीतरी पर्याय शोधत होती की तिला पतीचा सामनाही करायला लागू नये आणि सत्यही समोर यावं.

    नवी दिल्ली 14 जानेवारी : तुम्ही असं अनेकदा ऐकलं असेल की नवऱ्याकडून धोका मिळालेली पत्नी ही जखमी सिंहाप्रमाणे असते. ती इतकी खवळलेली असते, की आपल्यावर काही येताच समोरच्याची चिरफाड करेल. सलमान खानचा हा डायलॉग त्या महिलांना अगदी साजेसा आहे, ज्या पतीकडून धोका मिळाल्यावर शांतपणे अन्याय सहन करण्याऐवजी त्याच्याविरोधात उभा राहतात. यानंतर पुढे जे काही होतं, ते बातम्यांमध्ये अनेकदा पाहायला मिळतं. नुकतंच अशाच एका महिलेनं आपल्या पतीकडून मिळालेल्या धोक्याचा पर्दाफाश करण्यासाठी जो क्रूर प्लॅन केला होता, तो आपल्या सोशल साईट फेसबुकवर (Facebook Post) शेअर केला आहे. याशिवाय रेडिटवरही तिने ही पोस्ट शेअर केली आहे. नशीब बलवत्तर म्हणून तरुणाने मृत्यूलाही दिला चकवा; धडकी भरवणारा अपघाताचा VIDEO महिलेला आपल्या पतीवर (Cheating With Wife) संशय होता. यासाठी पतीचं सत्य समोर आणण्यासाठी तिने एक प्लॅन केला. मात्र, जेव्हा या गोष्टीत तिच्या पतीची साथ देणाऱ्या व्यक्तीबद्दल तिला समजलं तेव्हा ती थक्क झाली. महिलेला तिच्याच जवळच्या माणसांनी धोका दिला होता. कारमध्ये कंडोम (Condom in Car) आढळल्यापासून तिला पतीवर संशय होता आणि ती सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होती. ती असा काहीतरी पर्याय शोधत होती की तिला पतीचा सामनाही करायला लागू नये आणि सत्यही समोर यावं. महिलेनं कंडोमच्या प्रत्येक पॅकेटमध्ये एक छोटं छिद्र केलं आणि यानंतर सगळे पॅकेट मिर्चीच्या लिक्विडमध्ये भिजवून सुकवून पुन्हा कंडोमच्या पॅकेटमध्ये ठेवत कारमध्ये मांडले. पती झोपेत असतानाच तिने हे सर्व केलं. उठल्यानंतर पती आपण आईला मदत करण्यासाठी जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडला. बऱ्याच वेळाने पत्नीला तिच्या बेस्ट फ्रेंडचा फोन आला. ...अन् नवरीला सोडून लग्नमंडपातून नवरदेवाने काढला पळ; व्हायरल होतोय हा VIDEO मैत्रिणीने तिला आपली समस्या सांगून त्यावर उपाय विचारण्यासाठी फोन केला होता. या मैत्रिणीने महिलेला सांगितलं की बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवल्यानंतर तिला अत्यंत त्रास होत आहे. काही वेळाने महिलेचा पती घरी आला तेव्हा तोदेखील प्रचंड वेदनेत असल्याचं जाणवत होतं. त्याने घरी येताच बर्फ हातात घेऊन प्रायव्हेट पार्टवर लावला आणि तिथे जळजळ होत असल्याचं सांगितलं. यामुळे सगळं स्पष्ट झालं. एकाच वेळी महिलेचा पती आणि तिच्या मैत्रिणीने तीच समस्या सांगितली, ज्याची तयारी महिलेनं स्वतः केली होती. आता सत्य समोर आलं होतं. आपल्याच जवळच्या व्यक्तींनी दिलेला धोका हा महिलेसाठी मोठा धक्का होता. एका झटक्यात तिने आपल्या आयुष्यातील दोन महत्त्वाची माणसं गमावली होती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love story, Viral news

    पुढील बातम्या