• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • पती-पत्नी आणि 'ती'! महिलेने पतीला जिममध्ये पकडलं रंगेहाथ; तिची चपलेने केली धुलाई, पाहा VIDEO

पती-पत्नी आणि 'ती'! महिलेने पतीला जिममध्ये पकडलं रंगेहाथ; तिची चपलेने केली धुलाई, पाहा VIDEO

VIDEO : दरम्यान जिममध्ये मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 • Share this:
  मध्य प्रदेश, 18 ऑक्टोबर : मध्य प्रदेशची (Madhya Pradesh News) राजधानी भोपाळमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेने जिममध्ये गोंधळ घातला. कोहेफिजा भागातील एका जिममध्ये महिला आपल्या बहिणीसोबत गेली होती. येथे तिने आपल्या पतीला अन्य महिलेसोबत पाहून तिचं स्वत:वर नियंत्रणचं राहिलं नाही आणि तिने तेथे गोंधळ घातला.(Shocking Video Viral) यानंतर महिलेने आपल्या पतीच्या मैत्रिणीला मारहाण सुरू केली. तिने चपलेने पतीच्या मैत्रिणीला खूप मारलं. यादरम्यान तिचा पती आपल्या मैत्रिणीला वाचविण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र पत्नीसमोर त्याचं काहीचं चाललं नाही. (Woman catches her husband in the gym with his girl friend video goes viral) जिममध्ये घुसून मैत्रिणीला हाणलं.. यादरम्यान पती-पत्नीमध्येही मारहाण सुरू झाली. जिममध्ये व्यायाम करणारी दुसरी महिला देखील मध्ये येत दोघांमधील भांडण मिटवण्याचं प्रयत्न करते. आणि त्या व्यक्तीच्या मैत्रिणीला जिमच्या आतल्या भागात नेते. मात्र पत्नी तर मैत्रिणीच्या मागे जाऊन तिला मारहाण करते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे ही वाचा-भीषण! मंदिरात गर्दीकडून भक्तांना जबर मारहाण, एकाचा मृत्यू; घटनेचा Live Video कोहेफिजा टीआय अनिल वाजपेयी यांनी आजतकशी बोलताना या घटनेशी पुष्टी केली असून ही घटना 15 ऑक्टोबर रोजी घडल्याचं सांगितलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बऱ्याच दिवसांपासून पत्नीचा आपल्या पतीवर संशय होता. त्याचे अन्य महिलेसोबत संबंध आहेत, मात्र पतीने यास नकार दिला होता. 15 ऑक्टोबर रोजी महिला त्याचा पाठलाग करीत जिमपर्यंत पोहोचली. येथे तो मैत्रिणीसोबत दिसताच पत्नीचा पारा चढला. आणि पत्नी आणि पतीच्या मैत्रिणीमध्ये मारहाण झाली. याशिवाय पत्नीने यापूर्वीच पती आणि त्याच्या कुटुंबावर हुंड्यासाठी त्रास दिला जात असल्याची तक्रार केली आहे. या घटनेनंतर पतीच्या मैत्रिणीनेही महिलेविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: