• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • घरातून विचित्र आवाज येत असल्यानं सर्पमित्राला बोलावलं; सत्य समोर येताच शरमली महिला

घरातून विचित्र आवाज येत असल्यानं सर्पमित्राला बोलावलं; सत्य समोर येताच शरमली महिला

महिलेचा कॉल येताच रेस्क्यू टीम (Rescue Team) तिच्या घरी पोहोचली आणि सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, बराच वेळ त्यांना काहीच आढळलं नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली 31 ऑक्टोबर : साप आपल्या आसपास आहे, अशी कल्पना करूनही अनेकांना भीती वाटते. अशात तुम्हाला जर असं जाणवलं की तुमच्यात घरातच नागाच्या फुत्कारण्याचा आवाज आला तर काय अवस्था होईल? सिंगापुरमधील एका महिलेसोबत असंच घडलं. तिला आपल्या घरातून सतत सापाच्या फुत्कारण्याचा आवाज येत होता (Snake in the House). यामुळे महिलेनं तातडीनं रेस्क्यू टीमला (Rescue Team) घरी बोलावलं. झेब्र्यानं हरणाच्या पाडसावर केला भयंकर हल्ला, हृदय पिळवटणारा VIDEO घरातून येणाऱ्या या आवाजामुळे महिला इतकी घाबरली होती, की तिनं घरात तपासणी करून बघण्याआधीच रेस्क्यू टीमला बोलावलं. महिलेचा फोन येताच रेस्क्यू टीम घरी पोहोचली. मात्र, हे प्रकरण काहीतरी वेगळंच निघालं. रेस्क्यू टीमला घरात साप आढळला नाही . मात्र जे काही दिसलं, ते पाहून महिला शरमली. महिलेचा कॉल येताच रेस्क्यू टीम (Rescue Team) तिच्या घरी पोहोचली आणि सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, बराच वेळ त्यांना काहीच आढळलं नाही. अखेर त्यांनी कोब्रा नव्हे तर घरातून ती वस्तू शोधून काढली, ज्यातून हा आवाज येत होता. हा विचित्र आवाज महिलेच्या इलेक्ट्रिक टूथब्रशमधून (Electric Toothbrush) येत होता. सकाळी हा ब्रश वापरल्यानंतर तिनं तो खाली ठेवला आणि यात पाणी गेलं. याच कारणामुळे ब्रशमधून विचित्र आवाज येऊ लागले. महिलेला अजिबातही अंदाज नव्हता की असा आवाज एखाद्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटमधूनही येऊ शकतो. लग्नाआधीच नवरदेवाला भेटण्यासाठी उतावळी झाली नवरी; सासूला पाठवला अजब मेसेज, VIDEO महिलेच्या घरून जेव्हा रेस्क्यू टीमने इलेक्ट्रीक टूथब्रश काढला आणि तो ऑन, ऑफ करून पाहिला तेव्हा खात्री पटली की हे आवाज यातूनच येत होते. महिलेच्या घरात कोणताही साप आढळला नाही. या घटनेनंतर महिलेनं रेस्क्यू टीमची माफीही मागितली. ही घटना 2-3 महिन्यांपूर्वीची आहे, मात्र सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: