वॉशिंग्टन, 06 ऑगस्ट: विमानाने प्रवासाला निघालेल्या एका महिलेने विमान रद्द (flight cancelled) झाल्यानंतर टाइमपास म्हणून लॉटरीच्या तिकिटांची (lottery tickets) खरेदी केली होती. यापैकी एका तिकिटावर तिला तब्बल 7 कोटी 41 लाख 55 हजार 650 रुपयांचे (10 लाख डॉलर्स) बक्षीस मिळालं आणि तिचं नशीब फळफळलं आहे. अँजेला कॅरावेला (Angela Caravela) असं या नशीबवान महिलेचं नाव आहे. अमेरिकेतल्या (america) मिसूरीमधली ही घटना असून टाइमपास म्हणून खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकिटावर मोठं इनाम मिळाल्याने ही बातमी वेगाने व्हायरल (News Viral) झाली आहे.
‘द फास्टेट रोड टू यूएसडी 1000000’ हा स्क्रॅच गेम खेळताना तिला लॉटरी लागली असून, त्यामध्ये तिने तब्बल 10 लाख डॉलर जिंकले आहेत, असं फ्लोरिडा लॉटरीने दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. या महिलेने आपल्याला मिळालेलं बक्षीस एकाच हप्त्यात घेण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे तिला एकरकमी 7 लाख 90 हजार डॉलर्स मिळाले.
अमेरिकेच्या (USA) मिसूरी (Missourie) राज्यातल्या कन्सास (Kansas City) शहरात राहणाऱ्या 51 वर्षीय अँजेला कॅरावेला या महिलेच्या नशिबाची ही कथा आहे. टाइमपास म्हणून खरेदी केलेल्या लॉटरीवर एवढं मोठं बक्षीस मिळाल्याने अवघ्या काही मिनिटांमध्ये ही महिला करोडपती झाली आहे. फ्लाइट रद्द होणं इतकं फायद्याचं ठरेल, असा विचारही या महिलेने केला नव्हता.
मोबाइलवर बोलत असल्याने अंदाज चुकला; कारच्या धडकेत हवेत उडाली व्यक्ती, Shocking Video
अचानक लॉटरी जिंकल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना कॅरावेला यांनी सांगितलं, की ‘विमान अचानक रद्द झाल्यानंतर काही तरी वेगळं घडणार आहे, असं मला वाटत होतं. मी वेळ घालवण्यासाठी लॉटरीची काही तिकिटं खरेदी केली आणि त्यापैकी एका तिकिटावर 10 लाख डॉलर जिंकले.
कॅरावेला यांनी टॅम्पाच्या पूर्वेकडेच्या ब्रँडन शहरातल्या पब्लिक्स सुपरमार्केटमध्ये लॉटरीचं तिकिट खरेदी केलं होतं. आता त्या तिकीट विक्रेत्यालाही विजयी तिकीट त्याच्याकडून विकलं गेल्यामुळे 2 हजार डॉलर बोनस म्हणून मिळणार आहेत.
कमोडमधून येत होता विचित्र आवाज; उघडताच... ; पुढे काय झालं पाहा VIDEO
लॉटरी काढणं अमेरिकेत कायदेशीर
कॅरावेला हिने जिंकलेला यूएसडी 30 हा लॉटरीचा खेळ फेब्रुवारी 2020 मध्ये सुरू झाला असून, त्यामध्ये 10 लाख डॉलरची 155 बक्षिसं आहेत. तसंच, 94.8 कोटी डॉलरची रोख बक्षिसंही आहेत. यापूर्वीही अमेरिकेत अनेक लोकं लॉटरी लागल्याने एका दिवसात श्रीमंत झाले आहेत. अमेरिकेत लॉटरी हा कायदेशीर परवानगी असलेला खेळ आहे. जगातल्या अनेक देशांत अजूनही लॉटरीला कायदेशीर मान्यता नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.