लखनऊ 14 जानेवारी : उत्तर प्रदेशातील हरदोईमध्ये दारूच्या नशेत असलेल्या पतीला घरातील सदस्यांना त्रास देणं चांगलंच महागात पडलं आहे. या व्यक्तीची पत्नी, आई आणि बहिणीने मिळून त्याला काठीने मारहाण केली. तिघांनी मिळून त्या व्यक्तीला 30 सेकंदात 15 वेळा काठीने मारलं. दारुड्याला मारहाण केल्याचा व्हिडिओही समोर आला असून तो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
ती एक चूक नवरदेवाला पडली भलतीच महागात; प्रेमविवाहानंतर दुसऱ्याच दिवशी जोडप्याचा घटस्फोट
कछौना पोलीस स्टेशन हद्दीतील भानपूर येथील रहिवासी असलेला अमित अवस्थी हा बालामऊ येथील रेल्वे गंज येथे एका खाजगी दुकानात काम करतो. त्याच्या दारूच्या व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त आहे. दुकानातून मिळणाऱ्या पैशातून तो रोज दारू पिऊन गोंधळ घालतो. शुक्रवारीही अमित दारू पिऊन घरी पोहोचला आणि गोंधळ घालू लागला. पतीच्या या वागण्याने व्यथित झालेल्या पत्नी शिखा हिने सासू आणि नंदेसोबत मिळून अमितला काठ्यांनी बेदम मारहाण केली.
यादरम्यान रस्त्यावरून जाणारे लोक आणि दुकानदार प्रेक्षक म्हणून हे दृश्य पाहत राहिले. तो दररोज पत्नीकडून मार खात असल्याचं आसपासच्या दुकानदारांनी सांगितलं. अनेकवेळा घरच्यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यातही दिलं, मात्र तरीही तो सुधारला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
लग्नाआधी नवरदेवाचा पाय झाला फ्रॅक्चर; स्टेजवरच नवरीने केलं असं काम की पाहुणेही भावुक..VIDEO
न्यायाधिकारी बघौली विकास कुमार जयस्वाल यांनी सांगितलं की, तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तीन महिला त्या तरुणाला काठ्यांनी मारहाण करत आहेत. मारहाण करणाऱ्या महिला त्याची पत्नी, आई आणि बहीण असल्याचे सांगण्यात येत आहे. दारूच्या नशेत गोंधळ घातल्याने घरच्यांनी मारहाण केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.