नवी दिल्ली 07 डिसेंबर : एका विवाहित व्यक्तीचे घरातील महिला सफाई कामगारासोबत प्रेमसंबंध होते. एके दिवशी अचानक त्या व्यक्तीच्या बायकोला ही गोष्ट कळली. यानंतर पत्नीने महिला सफाई कामगाराला बेदम मारहाण केली. आता हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे.
प्रकरण ऑस्ट्रेलियाचे आहे. गोल्ड कोस्ट बुलेटिनच्या रिपोर्टनुसार, 45 वर्षीय जॅकलिन मेरी मॉरिसला ऑगस्टमध्ये तिच्या पतीच्या अफेअरबद्दल माहिती मिळाली. एका आठवड्यानंतर, तिने महिला सफाई कामगारासोबत भांडण केलं. विशेष म्हणजे मॉरिस आणि तिच्या पतीची दोन मुलंही आहेत.
अनेक पुरुषांचं एकाच महिलेशी होतं लग्न, वाद मिटवण्यासाठी करतात अनोखे उपाय
साउथपोर्ट मॅजिस्ट्रेट कोर्टात 5 डिसेंबर रोजी या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान, महिला क्लिनरने सांगितलं की ती गोल्ड कोस्टवर तिच्या कारमध्ये कोणाची तरी वाट पाहत होती. त्यानंतर मॉरिस तिथे पोहोचली आणि मॉरिसने तिला शिवीगाळ केली. प्रत्युत्तरात सफाई कामगारानेही शिवीगाळ करत म्हटलं - मला तुझ्या नवऱ्याची गरज नाही.
मॉरिसने न्यायालयात दावा केला की या महिला सफाई कामगारानेच आपल्याला यापूर्वी भडकावलं होतं. मॉरिसने सांगितलं की त्या महिलेने तिला म्हटलं की - तू तुझ्या पतीसोबत रोमान्स कसा करायचा हे शिकलं पाहिजे.
यानंतर मॉरिसने महिलेवर हल्ला केल्याचं सरकारी वकील डॉन रीड यांनी कोर्टात सांगितलं. तिने कारच्या खिडकीतून महिलेच्या चेहऱ्यावर अनेक वार केले आणि नंतर तिचे केस ओढले. त्यामुळे महिलेच्या चेहऱ्यावर जखमेच्या अनेक खुणा होत्या, तिचे काही केसही उपटले होते.
कोर्टात सांगण्यात आलं की, हल्ल्याच्या आठवडाभर आधी मॉरिसला पती आणि महिला सफाई कामगार यांच्यातील अफेअरची माहिती मिळाली होती. सदर महिला सफाई कामगार तब्बल 4 वर्षांपासून या कुटुंबासाठी काम करत होती. कोर्टात सांगण्यात आलं की, जेव्हा महिला सफाई कामगाराचा मॉरिसशी मेसेजवर बोलणं झालं, तेव्हा सफाई कामगाराने मॉरिसच्या पतीचे काही मेसेजही फॉरवर्ड केले. मॉरिसच्या पतीने या महिलेला अनेक सेक्शुअल मेसेज आणि न्यूड फोटोही पाठवले होते. मॉरिसने महिला सफाई कामगाराला मारहाण केल्याचा आरोप मान्य केला होता. मॉरिस अजूनही तिच्या पतीसोबत राहत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Viral news