मी एक डझन मास्क मागवले मग बाराच का आले? महिलेनं केला एकच गोंधळ, सोशल मिडियावर पिकला हशा

मी एक डझन मास्क मागवले मग बाराच का आले? महिलेनं केला एकच गोंधळ, सोशल मिडियावर पिकला हशा

एका महिलेनं मी एक डझन मास्क (One Dozen Masks) मागवले मात्र यात बाराच आले असं म्हणत एकच गोंधळ केला आहे. गणिताचं जास्त ज्ञान नसल्यानं या महिलेनं केलेल्या गोंधळानं सगळेच हैराण झाले.

  • Share this:

नवी दिल्ली 19 मार्च : सोशल मीडियावर अनेकदा अशा गोष्टी व्हायरल (Viral on Social Media) होतात ज्या पाहून तुम्ही हसू आवरुच शकत नाही. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये घरकामसाठी ठेवलेल्या काकू बॅचलर मुलांकडे आपला पूर्ण पगार मागत होत्या. तुम्ही मला दीड हजार अन् तीनशे रुपयेच का दिले? अठराशे रुपये द्या असं त्या या व्हिडीओमध्ये म्हणत होत्या. आता अशीच एक घटना अमेरिकेच्या मिनेसोटामधून समोर आली आहे. इथे एका महिलेनं मी एक डझन मास्क (One Dozen Masks) मागवले मात्र यात बाराच आले असं म्हणत एकच गोंधळ केला आहे. गणिताचं जास्त ज्ञान नसल्यानं या महिलेनं केलेल्या गोंधळानं सगळेच हैराण झाले.

कधी कधी ग्राहकांना एखादी गोष्ट समजून सांगणं किती अवघड जातं याचा प्रत्यय अमेरिकेच्या मिनसोटामध्ये आर्ट अॅण्ड क्राफ्ट्स स्टोर चालवणाऱ्या जेडा या महिलेसोबत घडलेल्या घटनेनं आला आहे. त्यांच्याकडे एक महिला ग्राहकानं आपल्या बेबी शॉवरसाठी एक डझन मास्कची ऑर्डर मागवली. जेडा वॉल्टच्या मालकीण जेडा मॅकक्रे यांनी ऑर्डरनुसार बारा मास्कसोबत 60 डॉलरचं बिल पाठवलं. मात्र, खरी अडचण तर त्यानंतर सुरू झाली.

एका डझनमध्ये बारा की वीस -

ऑर्डरच्या डिलिव्हरीनंतर जेडाला एक मेल आला. याच्या सब्जेक्टमध्ये मास्कची चुकीची ऑर्डर (Wrong Mask Order) असं लिहिलेलं पाहून जेडा आश्चर्यचकीत झाल्या. त्यांना वाटलं, की त्यांच्याकडून काही चूक झाली असेल मात्र संपूर्ण मेल वाचल्यानंतर त्या हैराण झाल्या. त्यांच्या या महिला ग्राहकानं मेलमध्ये लिहिलं होतं, की तिनं एक डझन मास्क ऑर्डर केले होते, मात्र तिला केवळ बाराच मास्क मिळाले आहेत. यामुळे तिला पूर्ण पैसे परत हवे होते. जेडा यांनी मेलला उत्तर देत या महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला, की एक डझनमध्ये बाराच मास्क येतात, मात्र, ती महिला आपल्याच म्हणण्यावर ठाम राहिली.

जेडानं तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला आणि हा मेल व्हायरल (Viral Mail) झाल्यानंतर महिला ग्राहकानं म्हटलं, की मी एक डझन समजून वीस मास्क मागवत होते. या महिलेनं डझनला डब्जन (Dubzen) समजत हा गैरसमज कसा करुन घेतला हे तिलाच माहिती. मात्र, तिच्या या गोंधळानं सोशल मीडियावर मात्र एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

Published by: Kiran Pharate
First published: March 19, 2021, 12:40 PM IST

ताज्या बातम्या