भोपाळ, 29 ऑगस्ट : एक धड आणि दोन डोकी, एकाच बाळाला तीन किंवा चार हातपाय अशा विचित्र जन्माला आलेल्या बाळांची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशाच आणखी एका विचित्र बाळाला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या बाळाला पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. या बाळाला पाय नाहीत पण पायाच्या जागी शिंग आहे आणि त्यातही शॉकिंग म्हणजे त्याला प्रायव्हेट पार्टही नाहीत.
मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात हे विचित्र बाळ जन्माला आलं आहे. भोडन गावातील महिलेला प्रसूतीसाठी मनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिने नवजात बाळाला जन्म दिला. बाळाच्या कमरेच्या वरील भाग सामान्य माणसांसारखाच आहे. कमरेखालील भाग विचित्र आहे. त्याचे दोन्ही पाय असे जुळलेले आहेत जणू गेंड्याचं शिंगच वाटत आहे. त्याला बोटं नाहीत. त्याच्या अशा पायामुळे मलमूत्र विसर्जन म्हणजे शौच आणि लघवी करण्याची जागाच त्याला नाही.
हे वाचा - खतरनाक! चिमुकलीच्या हातातील खेळणं पाहून भल्याभल्यांना फुटला घाम; असं आहे तरी काय पाहा VIDEO
असं विचित्र बाळ पाहून डॉक्टरही शॉक झाले. त्यांनी आई आणि बाळ दोघांनाही शिवपुरी रुग्णालयात पाठवलं. जिथं बाळाला एसएनसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार 24 तासांनंतरही हे बाळ निरोगी आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, नवजात बाळाचा विकास झालेला नाही. ते अविकसित जन्माला आलं आहे.
डोळे, नाक आणि तोंड नसलेलं बाळ
याआधी ब्राझीलमध्ये एक असं बाळ जन्माला आलं ज्याला चेहराच नव्हता. अत्यंत दुर्मिळ अशा ट्रेचर कॉलिन्स सिंड्रोम नावाचा आजार बाळाला झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या आजारात चेहऱ्यावरील जवळपास 40 हाडांचा विकासच होत नाही. हा अत्यंत दुर्मिळ आजार असून त्यात बाळं दगावण्याची शक्यताच अधिक असते. या आजारामुळे चेहऱ्यावरील नाक, कान आणि तोंड या अवयवांचा विकास होत नाही. असं बाळ जन्माला आल्यामुळे ते काही तासच जिवंत राहू शकेल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. प्रत्यक्षात मात्र या बाळानं डॉक्टरांचं म्हणणं खोटं ठरवलं.
हे वाचा - OMG! हात 2 पण पाय 3; विचित्र बाळाला पाहून कुटुंब हैराण, तपासणी करताच डॉक्टर म्हणाले...
ही मुलगी आजाराशी संघर्ष करत राहिली आणि आईवडिलांच्या संगोपनामुळे बरी होत गेली. मुलगी थोडी मोठी झाल्यावर तिच्या नाक, गाल आणि कानावर सर्जरी करण्यात आल्या. आता ही मुलगी आरोग्यपूर्ण आयुष्य जगत असल्याचं तिच्या आईवडिलांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Lifestyle, Madhya pradesh, Small baby