अहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे! जाणून घ्या एकदा...

अहो, इथं खरंच पैशाचं झाड आहे! जाणून घ्या एकदा...

खरंच पैशाचं झाड असेल तर? ग्रेट ब्रिटनमध्ये एक असं झाड आहे, ज्यावर हजारोंच्या संख्येत नाणी आहे. हे झाड दहा-वीस नाही, तर तब्बल 1700 वर्ष जुनं असल्याची माहिती आहे.

  • Share this:

लंडन, 16 जानेवारी : अनेकदा पैसे काय झाडावर उगवत नाहीत, असं बोलल्याचं ऐकिवात आहे. पण खरंच पैशाचं झाड असेल तर? ग्रेट ब्रिटनमध्ये एक असं झाड आहे, ज्यावर हजारोंच्या संख्येत नाणी आहे. पीक डिस्ट्रिक्टमध्ये हे झाड आहे. हे झाड दहा-वीस नाही, तर तब्बल 1700 वर्ष जुनं असल्याची माहिती आहे. या झाडावर असलेली नाणी लोकांनी लावली आहेत. केवळ ब्रिटनच नाही, तर जगभरातील देशातील लोकांनी या झाडावर नाणी लावली आहेत.

हे अनोखं झाड वेल्स येथील पोर्टमेरियन गावात आहे. जे आता एक प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉट ठरलं आहे. या झाडावर लोक दूर-दूरवरून येऊन नाणी लावतात. या झाडावर इतकी नाणी लावण्यात आहेत, की आता नाणी लावण्यासाठी जागाच उरली नाही. या झाडावर नाणी लावण्याबाबत अनेक श्रद्धा आहेत. त्या श्रद्धेमुळे अनेक जण या झाडावर नाणी लावण्यासाठी येतात.

(वाचा - मोडून पडला संसार पण...! सर्वकाही गमावल्यानंतर 100 रुपयात उभारला व्यवसाय)

या झाडावर नाणी लावल्याने इच्छा पूर्ण होते आणि घरात सुख-समृद्धी येते असं अनेकांचं म्हणणं आहे. अनेक जण या झाडात दैवी शक्तीचा वास असल्याचं सांगतात.

(वाचा - Headphone ने घेतला 'ती'चा जीव; बचावासाठी लोक ओरडत होते पण...पाहा LIVE VIDEO)

ख्रिसमसच्या काळात या झाडाजवळ मिठाई आणि गिफ्ट्स ठेवले जातात. या झाडावर लावण्यात येणारी नाणी अधिकतर ब्रिटनमधील आहेत, परंतु त्यासह जगभरातील देशातील नाणीही या झाडावर अनेक पर्यटकांकडून लावण्यात आली आहेत.

Published by: Karishma Bhurke
First published: January 17, 2021, 10:40 AM IST

ताज्या बातम्या