मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : उंच इमारतीच्या काचा पुसताना आला सोसाट्याचा वारा, पाहा काय झालं

VIDEO : उंच इमारतीच्या काचा पुसताना आला सोसाट्याचा वारा, पाहा काय झालं

उंचच उंच इमारती चकचकीत ठेवण्याचं काम अत्यंत धोकादायक असं असतं. यावेळी थोडासा हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो.

    फ्लोरिडा, 03 मे : जगात आता उंचच उंच इमारतींची गर्दी झाली आहे. दिसायला सुंदर असणाऱ्या या इमारती तशा ठेवण्यासाठी स्वच्छताही करावी लागते. तेव्ही जीव धोक्यात घालून या इमारती स्वच्छ करण्याचं काम केलं जातं. हे काम दिसायला सोपं वाटत असलं तरी त्यात धोका असतो. जसजसे वर जाईल तसं वाऱ्याचा त्रास होतो याशिवाय वरून खाली दिसणाऱ्या दृश्यानं गरगरायला होऊ शकतं. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  abcnews ने हा व्हिडिओ शेअर केला असून त्यात उंच इमारती स्वच्छ करताना काही लोक दिसतात. तेव्हा वाऱ्याच्या जोरदार धक्क्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो. दक्षिण फ्लोरिडामधील इमारत स्वच्छ करत असताना हवेचा जोर वाढतो. मात्र या परिस्थितीतही कामगारी त्यांचे काम करत राहतात.
    व्हिडिओमध्ये दिसतं की दोघेजण एका ट्रॉलीमधून बिल्डिंगच्या खिडक्या स्वच्छ करत आहेत. अचानक हवा जोरात येते त्यामुळे ट्रॉली हलायला लागते. दोघेही त्यांचे हात घट्ट धरतात आणि शांत राहतात. ट्रॉली हेलकावे खात असताना ते कोणत्याही प्रकारे गडबडून जात नाहीत. हे वाचा : तरुणाला सुरू झाला श्वसनाचा त्रास, X-Ray मधून समोर आली धक्कादायक माहिती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकांनी हे काम खूपच धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. थोडीशी चूक सुद्धा जीवावर बेतू शकते. अनेकांनी या कामगारांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. हे वाचा : आईच ती! आजारी पिल्लाला तोंडात धरून मांजरीन पोहोचली रुग्णालयात, पाहा PHOTO
    Published by:Suraj Yadav
    First published:

    पुढील बातम्या