मराठी बातम्या /बातम्या /Viral /मधमाशा संपुष्टात आल्यावर चार वर्षात मानवसृष्टीही नष्ट होणार? आईनस्टाईनचं ते विधान खरं की खोटं?

मधमाशा संपुष्टात आल्यावर चार वर्षात मानवसृष्टीही नष्ट होणार? आईनस्टाईनचं ते विधान खरं की खोटं?

 मधमाशीच्या (Bees) दंशाने खूप वेदना होतात; पण हे दंश करणाऱ्या मधमाश्याच नाहीशा झाल्या तर मानवी अस्तित्वच धोक्यात येईल. मानवी जीवनात मधमाश्या (Human life depends on bee) महत्त्वाची भूमिका निभावतात.

मधमाशीच्या (Bees) दंशाने खूप वेदना होतात; पण हे दंश करणाऱ्या मधमाश्याच नाहीशा झाल्या तर मानवी अस्तित्वच धोक्यात येईल. मानवी जीवनात मधमाश्या (Human life depends on bee) महत्त्वाची भूमिका निभावतात.

मधमाशीच्या (Bees) दंशाने खूप वेदना होतात; पण हे दंश करणाऱ्या मधमाश्याच नाहीशा झाल्या तर मानवी अस्तित्वच धोक्यात येईल. मानवी जीवनात मधमाश्या (Human life depends on bee) महत्त्वाची भूमिका निभावतात.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : मधमाशीच्या (Bees) दंशाने खूप वेदना होतात; पण हे दंश करणाऱ्या मधमाश्याच नाहीशा झाल्या तर मानवी अस्तित्वच धोक्यात येईल. मानवी जीवनात मधमाश्या (Human life depends on bee) महत्त्वाची भूमिका निभावतात. पृथ्वीवर मधमाश्या सर्वांत महत्त्वाच्या आहेत. मात्र, त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जागतिक तापमानवाढ, कमी होत चाललेली नैसर्गिक साधनसंपत्ती यामुळे मधमाश्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की मधमाश्या आणि मानवी आयुष्याचा काय संबंध? मधमाश्या नामशेष झाल्यानंतर आपलं अस्तित्व कसं धोक्यात येईल? प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन (Albert Einstein) यांनीसुद्धा मधमाश्यांचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. मधमाश्यांशिवाय मानव केवळ काही दिवसच पृथ्वीवर राहू शकतो, असं ते म्हणाले होते, असं सांगितलं जातं.

    पर्यावरणासाठी( Environment) मधमाश्या अत्यावश्यक असल्याचं अनेक अभ्यासातून उघड झालं आहे; मात्र आता त्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत असल्याचं समोर आलं आहे. 90 टक्के मधमाश्या नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती आहे. मधमाश्या गायब का होत आहेत, याचा अभ्यास केल्यानंतर अनेक कारणं समोर आली आहेत. जंगलतोड, मधमाश्यांसाठी सुरक्षित जागेचा अभाव, फुलांचा अभाव, पिकांवर होणारा कीटकनाशकांचा वापर, रसायनांमुळे मातीमध्ये होणारे बदल आणि फोनमधून निघणारे तरंगही मधमाश्यांच्या घटत्या संख्येला जबाबदार असल्याचं म्हटलं जातं.

    मधमाश्या (Bees) खूप महत्त्वाच्या आहेत. कारण, मधमाश्या परागीकरण करतात. पर्यावरणाचं संवर्धन करण्यात मधमाश्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे, कोणत्याही प्रकारच्या रोगांच्या त्या वाहक नाहीत. कृषी क्षेत्र मधमाश्यांवर अवलंबून आहे. मधमाश्यांमुळे परागीकरण होतं. त्या वनस्पतीवर अनेक जीव अवलंबून असतात. वनस्पतींचं पुनरुत्पादन झालं नाही, तर या वनस्पतींवर अवलंबून असलेले जीव लवकरच अदृश्य होऊ लागतील.

    हे सगळं खरं असलं, तरी पृथ्वीवरून मधमाश्या नष्ट झाल्यास मानवजात चार वर्षात नष्ट होईल, असं विधान आइन्स्टाइन यांनी केल्याची गोष्ट सिद्ध करणारा एकही पुरावा अद्याप सापडलेला नाही. पुस्तकांत असा उल्लेख सापडला नसल्याचं फॅक्ट चेकमधून (Facts about Bees) समोर आलं आहे. इंटरनेटवर चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं विदेशी वेबसाइट्सवर म्हटलं आहे. म्हणजे मधमाश्या महत्त्वाच्या आहेतच; पण त्यांच्याबद्दलच्या आइन्स्टाइनच्या नावावर सांगितल्या जाणाऱ्या विधानाची सत्यता पटलेली नाही.

    First published:
    top videos