Home /News /viral /

घराचं रक्षण करणारा कुत्रा करतोय कार पार्किंगसाठी मदत, पाहा VIDEO

घराचं रक्षण करणारा कुत्रा करतोय कार पार्किंगसाठी मदत, पाहा VIDEO

अनेक प्राणीप्रेमींना कुत्री फार आवडतात. ते कुत्र्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळतात आणि त्यांची काळजी घेतात. कुत्रे माणसांसोबत राहून बरीच कामं शिकतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मुंबई, 29 जून: कुत्रा (Dog) हा सर्वांत प्रामाणिक पाळीव प्राणी आहे, असं म्हटलं जातं. कुत्र्यांना नेहमीच सर्वात हुशार आणि माणसाच्या सर्वांत जवळचे प्राणी मानलं गेलं आहे. घराचं रक्षण करण्यापासून प्रामाणिकपणा, मैत्री (Friendship) आणि मालकांचं संरक्षण करण्याचं काम कुत्रे करतात. एकदा एखाद्या व्यक्तीला जवळचं मानलं की कुत्रे त्यांच्यासाठी काहीही करतात. अनेक प्राणीप्रेमींना कुत्री फार आवडतात. ते कुत्र्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळतात आणि त्यांची काळजी घेतात. कुत्रे माणसांसोबत राहून बरीच कामं शिकतात. हल्ली तर कुत्री मल्टीटॅलेंटेड (Multi Talented) झाली आहेत. त्यांना शिकवलं की ते घरातली बरीच कामं करू लागतात. वाईल्डलाइफ व्हायरल सीरिजमध्ये (Wildlife viral series) एक असाच व्हिडिओ दाखवला जातोय, ज्यामध्ये एक कुत्रा कार पार्क करण्यास मदत करताना दिसतो. आधी घराचं रक्षण करणारा आणि मालकाशी प्रामाणिक राहणारा कुत्रा आता कार पार्किंगसाठी सूचना देताना दिसतो. म्हणजेच कुत्रा एक आणि काम अनेक. या व्हिडिओला आतापर्यंत 2 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडियावर (Social Media) झपाट्याने व्हायरल होत असलेला व्हिडिओ खूप मजेशीर आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चकित झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर, व्हिडिओमध्ये कुत्रा इतकी जबाबदार भूमिका बजावताना दिसतोय, त्यामुळे पाहणारे लोकदेखील अवाक झाले आहेत. अशा महत्त्वाच्या कामासाठी कुत्री आता स्वत:ची समज विकसित करत आहेत. त्यामुळे त्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिलं जातंय, याचा गांभीर्याने विचार होऊ लागला आहे. हेही वाचा - बापरे! दोरीवरून 2 डोंगर पार करण्याचा तरुणाने केला प्रयत्न शेवटी...; काळीज घट्ट करून पाहा हा VIDEO हा व्हायरल व्हिडिओ कार पार्किंगसारख्या (Car Parking) ठिकाणचा आहे, जिथे कारच्या मागच्या बाजूला बसलेला एक कुत्रा कार पार्क करण्यासाठी कारला मागे-मागे येऊ देतो. त्यासाठी तो इशाराही करतो. आपण ज्याप्रमाणे गाडी पार्किंग करण्यास मदत करताना सूचना देतो, अगदी तशाच सूचना हा कुत्रा देत आहे. एकदाची ही गाडी योग्य ठिकाणी पार्क झाली की तो कुत्रा भुंकून ड्रायव्हरला त्याबद्दल सांगतो. फक्त ट्रेनिंग नाही तर स्वतःच्या समजुतीने काम करतात कुत्रे व्हिडिओमध्ये पार्किंग एरियात कार पार्क करण्यास मदत करणाऱ्या कुत्र्याला पाहून अनेकजण थक्क झाले आहेत, तर काही लोकांनी कोणत्याही प्राण्याला अशाप्रकारे ट्रेनिंग देऊन काम करायला लावल्याबद्दल आणि त्यांच्यावर दबाव आणल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हे काम सर्कसप्रमाणे असल्याचं मत एका युजरने व्यक्त केलं होतं, त्यावर दुसरा एक युजर म्हणाला की काही कुत्रे स्वतः इतके हुशार आहेत की त्यांना प्रत्येक कामासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची आवश्यकता नसते. वेळेनुसार त्यांच्यात खूप समज निर्माण होऊ लागली आहे आणि ते स्वतःच अशी कामे शिकू लागले आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून हा पार्किंगला मदत करणारा कुत्रा युजर्सना भुरळ घालतोय.
First published:

Tags: Viral, Viral news, Viral photo

पुढील बातम्या