मराठी बातम्या /बातम्या /Viral /जॅग्वारची एक उडी आणि मगरीचा खेळ खल्लास... शिकारीचा थरार व्हिडीओमध्ये कैद

जॅग्वारची एक उडी आणि मगरीचा खेळ खल्लास... शिकारीचा थरार व्हिडीओमध्ये कैद

जॅग्वारचा मगरीवर हल्ला

जॅग्वारचा मगरीवर हल्ला

जॅग्वार त्याच्या चपळतेसाठी ओळखला जातो. जमिनीसोबतच पाण्यातही तो जास्त वेगाने शिकार पकडण्यात यशस्वी होतो

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 29 जानेवारी : सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांशी संबंधीत आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात तर कधी अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ जॅग्वार आणि मगरीच्या भांडणाचा आहे.

जॅग्वार त्याच्या चपळतेसाठी ओळखला जातो. जमिनीसोबतच पाण्यातही तो जास्त वेगाने शिकार पकडण्यात यशस्वी होतो. एवढेच नाही तर जॅग्वारमध्ये झाडावरूनही आपली शिकार ओढून नेण्याची क्षमता आहे. जे फार कमी शिकारी प्राण्यांना जमतं.

हे ही पाहा : Video : मगरीनं जबडा पकडला तरी म्हशीनं दाखवली हिंमत, खेचत पाण्याबाहेर आणलं आणि...

जॅग्वारशी संबंधित एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. यामध्ये, जॅग्वार प्रथम झाडावरून उडी मारतो आणि नंतर मगरीला नदीतून कसे खेचतो ते आपण पाहू शकता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये जॅग्वारने नदीत जाऊन मगरीवर हल्ला केलाआहे. त्याने डोळ्यांची पापणी लवते न लवते, तोच झटक्यात मगरीची मान पकडली आणि तिला पाण्याबाहेर काढलं.

सहसा पाण्यात मगरी सर्वांवर वर्चस्व गाजवते, त्यामुळे तिच्यापासून इतर प्राणी लांब पळतात, कधी कधी वाघ-सिंह देखील मगरीपासून लांब पळतात. परंतु यावेळी जॅग्वारने मगरीवर मात करत थेट तिचीच शिकार केली आहे.

हे ही पाहा : ना Hight पाहिली ना weight पाणघोड्यावर चढली थेट, पुढे सिंहिणंचं काय झालं तुम्हीच पाहा Video

जॅग्वार आणि मगरीशी संबंधित हा व्हिडिओ wildlifeanimall नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

First published:

Tags: Shocking, Social media, Top trending, Videos viral, Viral, Wild animal, Wild life