मुंबई 26 जानेवारी : सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात, तर कधी ते अंगावर काटा आणणारे असतात. तसे पाहाता जंगलाचा हा नियमच आहे की प्राणी पोट भरण्यासाठी एकमेंकाची शिकार करतात. त्यामुळे तेथील प्राण्यांवर नेहमीच संकट असतं. सध्या सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
हा व्हिडीओ म्हैस आणि मगरीचा आहे. तुम्ही लोकांनी बऱ्याचदा बोलताना ऐकलं असेल की पाण्यात राहून मगरीशी वैर करणं म्हणजे जीवाशी खेळ... तसंच काहीसं या व्हिडीओत घडलं आहे. पण या म्हणीचा अर्थ म्हशीनं थोडा बदलला आहे.
खरंतर म्हशी तलावात उतरल्या असतात. त्या तळ्याच्या थंड पाण्याचा आनंद घेत असतात, पाणी पित असतात, पण त्यांना हे माहित नसतं की त्या पाण्यात मगर आहे.
अखेर मगर एका म्हशीचा जबडा पकडतेच. या घटनेनंतर सगळ्या म्हशी तलावा बाहेर पडतात. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की म्हशीच्या सोबतचं कोणतच तिच्या मदतीला येत नाही. त्यामुळे आता म्हशीचा खेळ संपलाच असं वाटू लागतं. पण तेवढ्यात ही म्हैस या मगरीलाच हळूहळू पाण्याबाहेर खेचते.
म्हशीची जीवन जगण्याची ही झुंज खरंच कौतुकास्पद आहे. कोणीही मदतीला येत नसताना आणि शत्रुच्या तावडीत अडकले असताना देखील म्हशीने हार मानली नाही. म्हशीने आपली संपूर्ण ताकद लावली आणि मगरीला खेचत-खेचत पूर्णपणे जमीनीवर आणली.
पण यानंतर काय घडणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. अखेर या भांडणात मगरीला हार मानावीच लागली. मगरीने म्हशीचा जबडा सोडला आणि पाण्यात गेली. ज्यामुळे म्हशीचे प्राण वाचले. हे फक्त आणि फक्त म्हशीच्या हुशारीमुळेच शक्य झाले. म्हशीने या मगरीशी पाण्यात नाही तर पाण्याबाहेर वैर घेतलं आणि आपली सुटका करुन घेतली.
कदाचित ही म्हैस पाण्यात राहिली असती, तर मगरीने तिला सोडलंच नसतं, त्यामुळे मगरीला पाण्यातून म्हणजेच तिच्या भागातून तिला लांब नेलं आणि प्राण वाचवले.
हा व्हिडीओ Sabi Sabi Reserve या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना सांगण्यात आले की, ''म्हशीने नाकाने एका मोठ्या मगरीला पाण्यातून बाहेर काढलं.''
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Videos viral, Viral, Wild animal, Wild life