मुंबई, 28 जानेवारी : जंगल आणि जंगली आयुष्य (Wild Life) हे अद्भुत विश्व आहे. या जगात राहणाऱ्या प्रत्येक प्राण्याला दिवस-रात्र स्वत:च्या सुरक्षेची चिंता असते. शाकाहारी असो वा मांसाहारी जंगलातील सर्वच प्राण्यांना त्यांच्या जीवाची भीती असते. कारण, अनेकदा मांसाहारी प्राणी त्यांची भूक भागवण्यासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करतात. अगदी हत्ती (Elephant) सारख्या महाकाय प्राण्यांना देखील या प्रकारच्या हल्ल्याला सामोरं जावं लागतं. सध्या ट्विटर (Twitter) वर एक लक्षवेधी व्हिडीओ (Video) शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सिंहीण (Lioness) आणि हत्तीची लढाई पाहयला मिळत आहे.
काय आहे व्हिडीओ?
या व्हिडीओमध्ये एक सिंहीण तिची सर्व शक्ती पणाला लावून हत्तीवर हल्ला करताना दिसते. सिंहिणीनं हत्तीच्या पाठीवर उडी मारली आहे, आणि ती सर्व शक्ती लावून हत्तीला मारण्याचा प्रयत्न करत आहे. या हल्ल्यानंतर हत्तीनं शरणागती पत्कारलेली नाही. तो देखील जीव वाचवण्यासाठी लढाई करण्यासाठी सज्ज झाला आहे.
हत्तीचा जोरदार प्रतिहल्ला
हत्तीनं सोंडेच्या मदतीनं पाठीवर बसलेल्या सिंहिणीला खाली टाकून दिलं. त्यानंतरही सिंहीण शिकारीचा प्रयत्न सोडत नाही. ती हत्तीचा मागचा पाय पकडते. त्यानंतर हत्ती मागच्या पायानं सिंहीणीला मारु लागतो. सिंहीण देखील चपळ आहे. ती हत्तीच्या सोंडेजवळ जावून त्याला चावण्याचा प्रयत्न करते. पण, महाकाय हत्तीसमोर तिची शक्ती कमी पडते. त्यानंतर हत्ती सिंहिणीला तिच्या सोंडवर लटाकावून नेतो आणि जमिनीमध्ये दाबण्याचा प्रयत्न करतो.
One Lioness Tries to Hunt Elephant #Kruger_Sightings pic.twitter.com/aCwTURUn8z
— ناجي الطخيم (@Naji_alt) January 26, 2021
सिंहिणीनं ठोकली धूम
हत्तीचं हे रौद्र रुप पाहून सिंहिणीला माघार घेण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. ती जीव वाचवण्यासाठी पळत सुटते. त्यानंतरही हत्ती तिचा पाठलाग करतो असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोमालिया देशातला हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.