जंगल फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या गाडीवर हत्तीचा हल्ला; जीव वाचवण्यासाठी धावत सुटले लोक, VIDEO
जंगल फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या गाडीवर हत्तीचा हल्ला; जीव वाचवण्यासाठी धावत सुटले लोक, VIDEO
पर्यटकांचा एक गट एका कारमधून जंगलात फिरण्यासाठी गेल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. यादरम्यान त्यांना रस्त्यावर एक हत्ती दिसला. हत्ती दिसल्यानंतर पर्यटकांना खूप आनंद झाला
नवी दिल्ली 16 मे : तुम्ही कधी जंगलात गेला असाल तर तुम्ही अनेक जंगली प्राणी पाहिले असतील. हत्ती हा जंगलातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला जातो. मात्र, हत्तीला राग आला तर त्यापेक्षा वाईट कोणीही नाही. सध्या सोशल मीडियावर जंगल सफारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक जंगल सफारीचा आनंद लुटण्यासाठी गेलेले दिसतात. मात्र हा आनंद भीतीमध्ये बदलला जेव्हा त्यांच्या गाडीवर हत्तीने हल्ला केला (Elephant Attack Video).
भर बाजारात महिला वकिलाला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण; लोक फक्त बघत राहिले, संतापजनक VIDEO
पर्यटकांचा एक गट एका कारमधून जंगलात फिरण्यासाठी गेल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. यादरम्यान त्यांना रस्त्यावर एक हत्ती दिसला. हत्ती दिसल्यानंतर पर्यटकांना खूप आनंद झाला. यानंतर त्यांनी त्या हत्तीचे फोटो काढायला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. मात्र, इतक्यात हत्तीला कशाचा तरी राग आला आणि त्याने पर्यटकांवर हल्ला केला. हत्ती इतका संतापला की त्याने थेट पर्यटकांच्या वाहनावरच हल्ला केला. यानंतर पर्यटकांनी तिथून पळ काढत आपला जीव वाचवला.
व्हिडिओमध्ये दिसतं की हत्ती खूप संतापलेला आहे. चांगली गोष्ट म्हणजे ड्रायव्हरने पटकन सर्व पर्यटकांना गाडीतून उतरवलं आणि तिथून दूर नेलं. जेणेकरून त्यांचा जीव वाचू शकला. पर्यटक गाडीतच राहिले असते तर हत्ती त्यांचा जीवही घेऊ शकत होता. अनेकदा रागात हत्ती माणसांनाही पायाने तुडवतो.
मगरीला पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला घडली आयुष्यभराची अद्दल, घटनेचा Shocking Video
हा धक्कादायक व्हिडिओ wildlife_welfare नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ अपलोड होताच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 30 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर व्हिडिओला 50 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी कमेंट करत जंगलात फिरण्यासाठी जाऊन प्राण्यांची शांतता भंग न करण्याचा सल्ला दिला आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.