नवी दिल्ली, 21 डिसेंबर : वन्य प्राणी आणि मानवाचा संघर्ष (Man animal conflict) तीव्र होत आहे. वन्य प्राणी (wild animal) मानवी वस्तीमध्ये येऊन किंवा शेतामध्ये येऊन हल्ले करत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. अशीच एक घटना आसाममधील धुबरी (Dhubri) जिल्ह्यात घडली आहे. एका जंगली हत्तीनं एका 30 वर्षीय व्यक्तीचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केला. धुबरी जिल्ह्यातील तामरहाट शहराजवळ उआनपेटला गावात शनिवारी घडलेल्या या घटनेचं स्थानिक नागरिकांनी फोनमध्ये रेकॉर्डिंग करून सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर (social networking platforms) शेअर केले. त्यानंतर ANI ने देखील या घटनेचा व्हिडीओ शेअर केला.
एक संतापलेला हत्ती व्यक्तीचा पाठलाग करत असून ती व्यक्ती आपला जीव मुठीत घेऊन पळत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. पळता-पळता ती व्यक्ती भाताच्या खाचरांमध्ये (paddy field) पडते. या संधीचा फायदा घेऊन हत्ती सोंडेनं त्या व्यक्तीवर हल्ला करतो आणि त्याला संपूर्ण शेतात ओढतो. हत्तीने केलेल्या या हल्ल्यात ती व्यक्ती गंभीर जखमी झाली असून उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. हल्ला केल्यानंतर हत्ती जंगलात निघून गेला मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तो अजूनही त्याच परिसरात फिरत आहे.
मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर पोस्ट झालेल्या या व्हिडीओवर नेटिझन्सनी (netizens) आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक ट्विटर युजर्सने या घटनेसाठी त्या व्यक्तीलाचं जबाबदार धरलं आहे. व्हिडीओ सुरू होण्यापूर्वी या व्यक्तीने हत्तीला डिवचलं असेल, म्हणूनच त्याने हल्ला केला असेल, असा आरोप काही ट्विटर युजर्सनं केला आहे. 'शांत लोकांना डिवचण्याचं काम करू नये, नंतर त्याची मोठी किंमत मोजावी लागते,' अशी कमेंट एका युजरनं केली आहे. 'हे दृश्य पाहण्यासाठीच किती भयानक वाटत आहे. जखमी झालेल्या व्यक्तीसाठी सरकारनं काहीतरी केलं पाहिजे,' अशी कमेंट आणखी एका युजरनं केली आहे.
हत्तींनी माणसांवर हल्ला केल्याची ही काही पहिलीचं घटना नाही. काही दिवसांपूर्वीच आसाममधील नुमालीगढ (Numaligarh) येथे अशीच एक घटना घडली होती. पास्कल मुंडा (Pascal Munda) नावाच्या माणसाचा हत्तींनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. मोरोंगी चहाच्या मळ्यात (Morongi tea estate) काम करणाऱ्या पास्कल आणि इतर कामगारांनी हत्तींच्या कळपाला डिवचण्याचं काम केलं. त्यानंतर चवताळलेल्या हत्तींनी उलट हल्ला केला. त्यामध्ये पास्कलचा मृत्यू झाला.
#WATCH | A 30-year-old man was chased and attacked by a wild elephant at a village in Tamarhat area of Dhubri district of Assam on December 18 "The man was admitted to a hospital for treatment and the elephant was chased towards jungle area," a forest officer said pic.twitter.com/YsRvZAUe1h
— ANI (@ANI) December 20, 2021
पीटीआयच्या माहितीनुसार, आसाममध्ये माणूस आणि हत्तींच्या संघर्षामध्ये (human and elephant conflict) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सर्वात जास्त हत्ती असलेल्या या राज्यात हत्तींच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. जंगलांची जागा शेती आणि चहाच्या मळ्यांनी घेतली आहे, त्यामुळे हत्ती बेघर झाले आहेत. या वर्षी आसाममध्ये खड्ड्यांमध्ये पडून 71 हत्तींचा मृत्यू झाला आहे तर हत्तींच्या हल्ल्यामध्ये 61 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Attack, Elephant, Video viral