Home /News /viral /

अजबच! बायकोनंच दिली नवऱ्यासाठी गर्लफ्रेंड शोधायला जाहिरात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

अजबच! बायकोनंच दिली नवऱ्यासाठी गर्लफ्रेंड शोधायला जाहिरात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या या नवऱ्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडबाबतचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. बायकोनंच नवऱ्यासाठी घरात दुसरी गर्लफ्रेंड आणल्याची घटना दुर्मिळ म्हणावी लागेल.

नवी दिल्ली, 04 ऑगस्ट : नवरा किंवा बायकोच्या विवाहबाह्य संबंधांमुळे लग्नाचं नातं तुटण्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. मात्र बायकोनंच नवऱ्यासाठी घरात दुसरी गर्लफ्रेंड आणल्याची घटना दुर्मिळ म्हणावी लागेल. सोशल मीडियावर सध्या या नवऱ्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडबाबतचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. आज तक हिंदीनं हे वृत्त दिलं आहे. नवरा-बायकोच्या नात्यात विश्वास नसला, तर ते नातं टिकू शकत नाही. विश्वासाला तडा जाण्यासाठी अनेक कारणं असतात. त्यापैकी महत्त्वाचं कारण असतं नवरा-बायकोमध्ये तिसऱ्या व्यक्तीचं येणं. बहुतेकवेळा नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक लग्न तुटतात. मात्र सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या एका व्हिडिओत चक्क बायकोनंच नवऱ्यासाठी दुसरी गर्लफ्रेंड (Woman Offer A Job Of Husbands Girlfriend) आणली आहे. त्यासाठी तिनं सोशल मीडियावर एक जाहिरात दिली होती. त्यात नवऱ्यासाठी 3 गर्लफ्रेंड्स हव्या आहेत व त्यांना त्याबदल्यात महिना 32 रुपयांचा पगारही दिला जाईल असंही सांगितलं होतं. या गर्लफ्रेंड्सना नवऱ्याला खूश ठेवण्याबरोबरच घरातल्या कामात मदत करण्याचं काम असेल, असंही तिनं जाहिरातीत म्हटलं होतं. 44 वर्षांच्या पत्थीमा यांनी त्यांच्या पतीसाठी ही जाहिरात दिली होती. त्यावर त्यांना नवऱ्यासाठी सध्या एक गर्लफ्रेंड मिळाली आहे, तर अजून दोन पोस्ट रिकाम्या आहेत. Thaiger च्या रिपोर्टनुसार, पत्थीमानं टिकटॉकवर (TikTok) याबाबतचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या जॉबसाठी अप्लाय करणाऱ्या महिलांनी एचआयव्ही (HIV) टेस्ट करणं बंधनकारक आहे. त्यांचं वय 30-35 दरम्यान असावं, तसंच त्यांच्याकडे हायस्कूल किंवा पदवीची डिग्री असली पाहिजे. या स्त्रियांना विनामूल्य घरात राहता व खाता येईल. थाई सोशल मीडियावर हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला आहे. आपण डिप्रेशनच्या (Depression) आजारामुळे हा निर्णय घेत असल्याचं या व्हिडिओत पत्थीमा यांनी सांगितलं आहे. हेही वाचा - इम्प्रेस करायला म्हणून गर्लफ्रेंडला दिली कार; तिच्यासह बॉयफ्रेंड तुरुंगात, वडिलांवरही गुन्हा
 
आता कुटुंबामध्ये एक ‘छोटी पत्नी’ येणार आहे. आम्ही एका घरात आनंदानं राहू व एकमेकांची काळजी घेऊ असं या व्हिडिओत त्यांनी म्हटलंय. आमच्यात अजिबात भांडण होणार नाही. हव्या त्या व्यक्तीसोबत राहण्याचं स्वातंत्र्य नवऱ्याला देणार असल्याचंही त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय. सध्या एका आजारामुळे रोज झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागत असल्याचं पत्थीमा सांगतात. त्यामुळे लवकर झोप येते. म्हणून नवरा व कुटुंबाकडे इतर बायकांप्रमाणे लक्ष देऊ शकत नाही, असंही त्या म्हणतात. सोशल मीडियावर मात्र या व्हिडिओबाबत अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. काहींनी याला प्रसिद्धीसाठीचा स्टंट म्हटलं, तर काहींनी मनोरंजासाठी असा व्हिडिओ केल्याचा आरोप केला. पत्थीमा यांनी मात्र याबाबत गंभीर असल्याचं सांगितलंय. जॉब व्हेकन्सीच्या अनेक जाहिराती असतात. मात्र अशा प्रकारे आजवर कोणी जॉब ऑफर केला नसेल. नवरा व कुटुंबाची जबाबदारी स्वतःहून दुसऱ्या स्त्रीला देणारी ही पत्नी अजबच म्हणावी लागेल.
First published:

Tags: Video viral, Viral news

पुढील बातम्या