मास्कवरून विमानात पती-पत्नीमध्ये WWF; पतीने शिवी देताच पत्नीनं लगावली कानशिलात, पाहा VIDEO

मास्कवरून विमानात पती-पत्नीमध्ये WWF; पतीने शिवी देताच पत्नीनं लगावली कानशिलात, पाहा VIDEO

मास्कवरून विमानातच रंगला WWFचा थरार, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : कोरोना काळात अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असताना आता विमानं सुरू करण्यात आली आहे. याच दरम्यान ईजी जेट विमानातून प्रवास करत असताना WWF सामना पाहायला मिळाला. या विमानात प्रवासादरम्यान पती-पत्नीमध्ये मास्कवरून WWF झालं आणि सर्वजण हा सगळा गोंधळ पाहात राहिले.

प्रवासादरम्यान जेव्हा पत्नीने मास्क घालायला सांगितला तेव्हा पतीने जोरात शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि मास्क घालण्यासाठी नकार दिला. संतापलेल्या पत्नीने पतीच्या खणखणीत कानशिलात लगावली आहे. पती-पत्नीचं हे भांडण WWF मध्ये बदललं आणि विमानातला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे वाचा-रावण दहनादरम्यान घडला भयंकर प्रकार; जीव मुठीत घेऊन पळाले लोक, पाहा VIDEO

विमानात प्रवासादरम्यान सहप्रवाशानं तरुणाला मास्क घालण्याची विनंती केली त्यावर उडवाउडवीची उत्तर या तरुणानं दिली. बराच काळ हा वाद सुरू होता. त्यावेळी पत्नी शांत करण्यासाठी पतीकडे आली. मात्र पतीने शांत होण्याऐवजी पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मास्क जेवढा जास्त वेळ घालाल तेवढा कोरोना जास्त काळ टिकेल असाही या तरुणानं दावा केला.

या संपूर्ण भांडणात पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने पतीच्या श्रीमुखात भडकावली. यामुळे विमानात चांगलाच गोंधळ झाला. यांच्यातला मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 26, 2020, 2:08 PM IST

ताज्या बातम्या