मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO - पत्नीच्या प्रेमासमोर मृत्यूही हरला! कलियुगातील 'सावित्री'ने स्वतःचा 'प्राण' फुंकून वाचवला पतीचा जीव

VIDEO - पत्नीच्या प्रेमासमोर मृत्यूही हरला! कलियुगातील 'सावित्री'ने स्वतःचा 'प्राण' फुंकून वाचवला पतीचा जीव

बायकोने वाचवला नवऱ्याचा जीव

बायकोने वाचवला नवऱ्याचा जीव

आपला श्वास देऊन बायकोने आपल्या नवऱ्याला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India
  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 01 ऑक्टोबर : सत्यवान-सावित्रीची कहाणी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. सावित्रीने कसे आपल्या मृत पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. तिने आपल्या मृत पतीलाही पुन्हा जिवंत केलं होतं. सध्या कलियुगातील अशाच एका सावित्रीचा व्हिडीओ समोर आला आहे. जिने आपल्या पतीमध्ये आपला प्राण फुंकून त्याचा जीव वाचवला आला. बायकोने आपल्या नवऱ्याला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं आहे.

उत्तर प्रदेशच्या मथुरामधील या घटनेच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. माहितीनुसार 67 वर्षांचे केशवन आपली पत्नी दयासोबत कोइंबतूर एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत होते. दिल्लीहून ते कोझिकोडला जात होते. तेव्हा अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यांना चालत्या ट्रेनमध्ये हार्ट अटॅक आला. जशी ट्रेन मथुरा स्टेशनवर आली तसं इतर प्रवाशांच्या मदतीने त्यांना मथुरा स्टेशनवर उतरवण्यात आलं. तिथं आरपीएफ जवान तात्काळ मदतीसाठी धावून आले. RPF ने कंट्रोल रूमला सूचना देऊन अॅम्ब्युलन्स पाठवायला सांगितलं होतं.

हे वाचा - एअरपोर्टवरच प्रवाशाला Heart attack; CISF जवानाने असा वाचवला जीव की VIDEO पाहून सर्वांनी केलं सॅल्युट

तोपर्यंत केशवन यांचा जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. हार्ट अटॅक आल्यानंतर आपात्कालीन परिस्थिती सीपीआर वरदान ठरतो. त्यामुळे केशवन यांना सीपीआर देण्यात आला. सीपीआर हा छातीवर हातांनी दाब देऊन किंवा तोंडाने श्वास देऊन दिला जातो. केशवन यांना दोन्ही पद्धतीने सीपीआर देण्यात आला. आरपीएफ जवानांनी त्यांना चेस्ट सीपीआर दिला तर त्यांच्या पत्नीने त्यांना माऊथ सीपीआर दिला.

पतीला तोंडाने आपला श्वास देऊन पत्नीने पतीच्या शरीरात आपले प्राण फुंकले आणि अवघ्या 33 सेकंदातच चमत्कार झाला. ज्या शरीर मृतावस्थेत होतं, त्या शरीरात हालचाल जाणवू लागली. तोपर्यंत अॅम्ब्युलन्सही आली. आणि केशवन यांना अॅम्ब्युलन्समधून रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

हे वाचा - Maa Robot Video : बायको आजारी म्हणून दिव्यांग लेकीला दिली अशी आई; मजूर बाबाचा आविष्कार पाहून भलेभले थक्क

दैनिक भास्करच्या वृत्तानुसार केशवन यांची प्रकृती गंभीर होती म्हणून त्यांना  खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Uttar pradesh, Viral, Viral videos