पत्नीने पतीसोबत केला धमाल प्रँक; ओरडतच गेला बेडरुमबाहेर...पाहा VIDEO

पत्नीने पतीसोबत केला धमाल प्रँक; ओरडतच गेला बेडरुमबाहेर...पाहा VIDEO

या पत्नीने नवऱ्याला अस्सं वेड्यात काढलं की...

  • Share this:

एका महिलेने नवऱ्यावर एक मजेदार प्रँक केला. यामध्ये नवरा इतका घाबरला की तो ओरडतच बेडरुमबाहेर गेला. या हुशार पत्नीने पतीवर  बनावटी सांपाचा प्रँक केला. (Woman Plays Prank On Husband With Fake Snake) यावेळी त्याची प्रतिक्रिया इतकी मजेदार होती की हसून हसून तुमचं पोट दुखू लागले. इंस्टाग्राम युजर, लोसेना याने या प्रसंगाचा एक छोटा व्हिडीओ पोस्ट केला आणि तो व्हायरल (Viral Video) झाला आहे. महिलेने दारासमोर एक पट्टा लावला. त्याने हा पट्टा अशा प्रकारे ठेवला की तो सापासारखा दिसतो. पतीने खोलीत प्रवेश करताच तलवारीने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर (Social Media) हा प्रँक व्हिडीओ (Prank Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

महिलेने तिच्या खोलीत जमिनीवर एक पट्टा ठेवला आणि तिच्या नवऱ्याला हाक मारली, "बेबी, इथे काहीतरी आहे." बायकोचा आवाज ऐकून  तिचा नवरा खोलीत शिरला आणि एकदम घाबरून गेला. कारण त्याला तो पट्टा साप असल्याचे वाटले. इतकचं नाही तर तो तलवारीसह खोलीत आला आणि जोरजोरात ओरडत पट्ट्यावर हल्ला करू लागला. मग त्याने विचारले, "ते काय होते?" बायको हसून म्हणाली, 'हा पट्टा आहे.'

View this post on Instagram

A post shared by lowsena (@lowsena)

लोसेनाने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'माझ्या नवऱ्यावर आणखी एक प्रँक. त्याला सापांची भीती वाटते. तो तलवार घेऊन खोलीत आहे...एकदम परफेक्ट..'

Published by: Meenal Gangurde
First published: December 25, 2020, 6:55 PM IST

ताज्या बातम्या