मराठी बातम्या /बातम्या /Viral /पत्नीनं सकाळी सीमेवरील पतीचा फोटो कपल चॅलेंजमध्ये केला शेअर; सायंकाळी आली दु:खद बातमी

पत्नीनं सकाळी सीमेवरील पतीचा फोटो कपल चॅलेंजमध्ये केला शेअर; सायंकाळी आली दु:खद बातमी

सीमेवर जवान कायमच जीव तळहातावर घेऊन काम करीत असतात.

सीमेवर जवान कायमच जीव तळहातावर घेऊन काम करीत असतात.

सीमेवर जवान कायमच जीव तळहातावर घेऊन काम करीत असतात.

जळगाव, 7  फेब्रुवारी : सध्या फेसबुकवर (Facebook) 'आयुष्यभराचा जोडीदार' हे चॅलेंज (challenge) ट्रेंडमध्ये आहे. अनेक जोडपी (couples) आपले फोटो अपलोड करत आहेत. एका व्यक्तीच्या चॅलेंजनं मात्र कित्येकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. 'सकाळ'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. एरंडोल इथले असलेले बीसीएफ जवान (BSF Jawan) राहुल पाटील पंजाब इथं ड्युटीवर असताना वारले. त्यांचं निधन हृदयविकारच्या धक्क्यानं (heart attack) झालं. एकाएकी झालेला हा आघात त्यांच्या कुटुंबासाठी मोठाच धक्कादायक ठरला.

याबाबत लोक हळहळत असतानाच  फेसबुकवर राहुल पाटील यांनी केलेली पोस्ट अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली. फेसबुकवर 'आयुष्यभराचा जोडीदार' चॅलेंज करणाऱ्या ज्योती पाटील त्यांच्याशी नियतीनं मोठाच दुर्दैवी खेळ केला. त्यांना त्यांच्या जोडीदारापासून आयुष्यभरासाठी दूर जावं लागलं आहे. एरंडोल इथले राहुल पाटील पंजाबमध्ये (Punjab) पाकिस्तानलगत असलेल्या फाजिलंका बॉर्डरवर (border) ड्युटी करत होते. इथं आपल्या निवासस्थानात असतानाच त्यांना एकाएकी  हृदयविकाराचा झटका आला. त्यांचं त्यातच निधन झालं. निधनाची बातमी घरी पोचली तसा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सगळ्या कुटुंबाचा भयानक आक्रोश पाहून पंचक्रोशीतले लोक हळहळत होते.

हे ही वाचा-उत्तराखंडमधील महाभयंकर दृश्यांनंतर एक आशादायी VIDEO

त्यातही दुर्दैवी गोष्ट काय, तर ही वाईट घटना घडण्याच्या केवळ आठ तास आधीच पत्नी ज्योती पाटील यांनी फेसबुकवर 'आयुष्यभराचा जोडीदार चॅलेंज'मध्ये टॅग करत पती राहुल यांच्यासह फोटो शेअर केला होता. या पोस्टला खूप प्रतिसादही मिळाला. मात्र त्यानंतर काही काळातच हे भयानक वृत्त ज्योती यांना ऐकावं लागलं. राहुल आणि ज्योतीच्या मुलीचा वाढदिवस (birthday) गुरुवारी 4 फेब्रुवारीला झाला. राहुल यांनी मुलीला शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉल केला होता. कुटुंबातील सगळ्यांशीही त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. या दुर्दैवी योगायोगामुळं लोक अजूनच जास्त हळहळत आहेत.

First published:

Tags: Facebook, Wife