मराठी बातम्या /बातम्या /Viral /बिच्चारा! बायकोनं बनवले कडक नियम, वाचूनच येईल नवऱ्याची दया

बिच्चारा! बायकोनं बनवले कडक नियम, वाचूनच येईल नवऱ्याची दया

बायकोनं तिच्या नवऱ्यासाठी असे काही (Wife makes strict rules for her husband and shares on social media) कडक नियम बनवले की त्या नवऱ्यापेक्षा नियम वाचणाऱ्यांनाच अधिक वाईट वाटू लागलं आहे

बायकोनं तिच्या नवऱ्यासाठी असे काही (Wife makes strict rules for her husband and shares on social media) कडक नियम बनवले की त्या नवऱ्यापेक्षा नियम वाचणाऱ्यांनाच अधिक वाईट वाटू लागलं आहे

बायकोनं तिच्या नवऱ्यासाठी असे काही (Wife makes strict rules for her husband and shares on social media) कडक नियम बनवले की त्या नवऱ्यापेक्षा नियम वाचणाऱ्यांनाच अधिक वाईट वाटू लागलं आहे

बायकोनं तिच्या नवऱ्यासाठी असे काही (Wife makes strict rules for her husband and shares on social media) कडक नियम बनवले की त्या नवऱ्यापेक्षा नियम वाचणाऱ्यांनाच अधिक वाईट वाटू लागलं आहे. जेव्हा या महिलेनं आपल्या पतीसाठी केलेले नियम सोशल मीडियावरून (Strict rules for husband) जाहीर केले, तेव्हा ते वाचून अनेकांनी तोंडात बोट घातलं. वास्तविक, पती आणि पत्नी यांचं नातं त्यांच्यात किती खेळकर संबंध आहेत, त्यावर (Husband and Wife relationship) अवलंबून असतं. ज्या नात्यात कुठलाही दबाव नसतो, बंधनं नसतात आणि हेवेदावे नसतात, ते नातं अधिक सकस मानलं जातं. मात्र जेव्हा एखादा जोडीदार दुसऱ्या जोडीदारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू लागतो, त्याच्या भावनांना नियंत्रित करू लागतो आणि त्याच्या वागण्यावर बंधनं घालू लागतो, तेव्हा ते नातं डळमळीत झाल्याचं मानलं जातं.

पत्नीनं घातले कडक निर्बंध

@Bmcpher नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून सध्या एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक महिला आपल्या पतीवर घातलेल्या निर्बंधांविषयी माहिती देत आहे. लग्नानंतर आपल्या अटी स्पष्ट आहेत् आणि त्या मान्य कराव्याच लागतील, असं ही महिला व्हिडिओत म्हणते. तिने आपल्या पतीला नेमक्या काय अटी घातल्या आहेत, हेदेखील तिने या व्हिडिओत सांगितलं आहे.

महिलांशी ‘नो दोस्ती’

महिलेनं पतीला घातलेल्या अटींमध्ये पहिली अट हीच आहे की पत्नी सोडून इतर कुठल्याही महिलेसोबत पती मैत्री करू शकणार नाही. ऑफिसमधील कुठल्याही महिला सहकाऱ्यासोबतही त्याला मैत्री करता येणार नाही.

मेसेजही करायचा नाही

पत्नीनं घातलेल्या अटीनुसार पती कुठल्याही महिलेला व्हॉट्सअपवरून किंवा कुठल्याही प्रकारे मेसेज करू शकणार नाही. जर काही प्रसंगात त्याला नाईलाजाने मेसेज पाठवावा लागला, तर त्याची पूर्वकल्पना पत्नीला देणं बंधनकारक असणार आहे.

नेहमी पत्नीची बाजू घेणं बंधनकारक

समजा, आई आणि पत्नी यांचं एखाद्या विषय़ावर वेगवेगळं मत पडलं, तर पती हा नेहमी पत्नीच्या बाजूनं उभा राहिल. त्याचं स्वतःचं मत काहीही असलं तरी तो नेहमी पत्नीच्या बाजूने उभा राहिल.

हे वाचा - परेड सुरू असताना गर्दीत शिरली SUV; चिरडून अनेकांचा मृत्यू, धक्कादायक VIDEO

युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

अनेक युजर्सनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहे. काहीजणांनी या पतीविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे. तर अनेकांनी आपल्याला अशी पत्नी मिळाली नसल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहेत.

First published:
top videos

    Tags: Rules, Viral video., Wife and husband