Adventurous Sex आलं अंगाशी; पतीला खुश करण्याच्या नादात पत्नीनं गमावला जीव

Adventurous Sex आलं अंगाशी; पतीला खुश करण्याच्या नादात पत्नीनं गमावला जीव

या प्रकरणी न्यायालयानं पत्नीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या या बेजबाबदार पतीला दोषी ठरवून सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

  • Share this:

मुंबई 7 मे: आजकाल अॅडव्हेंचरस सेक्स (Adventurous Sex) अर्थात थरारक किंवा साहसी कामक्रीडेची क्रेझ वाढत आहे. यामध्ये अनेक जोडपी आपल्या जोडीदाराला खुर्चीला बांधून ठेवतात, किंवा बेडवर दोन्ही हातपाय बांधून ठेवतात, तोंडात बोळा कोंबतात असे अनेक प्रकार केले जातात. मात्र अशी कामक्रीडा कधीकधी जीवावर बेतू शकते. अशा अनेक घटना घडल्या आहेत. ब्रिटनमध्येही (Britain) नुकतीच अशी एक घटना उघडकीस आली आहे. यात अशा अॅडव्हेंचरस सेक्ससाठी गेलेल्या एका जोडप्यातील पती नशेत धुंद असल्यानं पत्नीला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, या प्रकरणी न्यायालयानं पत्नीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या या बेजबाबदार पतीला दोषी ठरवून सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

नॉर्थ वेल्स लाइव्हच्या वृत्तानुसार, क्लिनिंगच्या व्यवसायात व्यवस्थापक पदावर कार्यरत असणारा 52 वर्षीय वॉरेन मार्टिन कॉल्टन आपली 38 वर्षीय पत्नी क्लेअर व्हाईटसह सुट्टीत मजा करण्यासाठी आणि रोमँटिक साहसासाठी एका अलिशान रिसॉर्टमध्ये गेले होते. वॉरेन आणि क्लेअर अॅडव्हेंचरस सेक्सच्या तयारीनेच इथं आले होते. त्यांनी येतानाच आपल्या सोबत ग्लोव्हज, रेड टेप, व्हाईट टेप असे साहित्य आणलं होतं.

अॅडव्हेंचरस सेक्स करण्यासाठी मार्टिननं क्लेअरला खुर्चीला बांधलं आणि तिच्या तोंडात एक मोजा कोंबला. मार्टिननं भरपूर नशाही केली होती. त्यामुळं पत्नीला बांधल्यानंतर तो गाढ झोपून गेला. क्लेअरला आपण बांधलं आहे आणि तिच्या तोंडात बोळा आहे, याचं भानही त्याला उरलं नाही. त्यामुळं श्वास गुदमरला तरी क्लेअर काहीही करू शकली नाही आणि ती मरण पावली. मार्टिन सकाळी उठला तेव्हा त्याला दिसलं की क्लेअर मरण पावली आहे. मात्र त्याबद्दल पोलिसांना कळवण्याऐवजी तो तिथून पळून गेला. रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी क्लेअरचा मृतदेह बघून पोलिसांना कळवलं. मार्टिननं क्लेअरच्या तोंडावर टेपदेखील बांधली होती का हे मात्र समजू शकलं नाही.

दी सनच्या वृत्तानुसार, या घटनेमुळं क्लेअरच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. क्लेअरची आई ज्युली डेव्हिस मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यानं मानसिक आजाराला बळी पडली आहे. आपल्या मुलीचा आवाज आपण पुन्हा कधीच ऐकू शकणार नाही या कल्पनेनं तिला मोठा धक्का बसला आहे. क्लेअरची बहीण क्रिस्टी राईट ही देखील क्लेअर गेल्यानंतर पीटीएसडी आजारानं ग्रस्त झाली आहे. ‘आपल्यावर कोणीतरी हल्ला करत आहे, कोणीतरी आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी स्वप्नं पडत असल्याचं तिनं सांगितलं. आपलं कुटुंब हा धक्का पचवू शकलेलं नाही, असंही तिनं सांगितलं.

मोल्ड क्राउन कोर्टाच्या न्यायाधीशांनी मार्टिनच्या दुर्लक्षामुळे क्लेअरचा मृत्यू झाल्याचं म्हटलं. त्यानं अंमली पदार्थांचा वापर टाळला असता तर तो आपल्या पत्नीला मृत्यूपासून वाचवू शकला असता, असं न्यायालयानं त्याला शिक्षा देताना नमूद केलं.

Published by: Mandar Gurav
First published: May 7, 2021, 11:19 AM IST

ताज्या बातम्या