Home /News /viral /

OMG! भांडी घासण्याचा स्पंज खातायेत या शहरातले लोक? वाचा यामागचं कारण

OMG! भांडी घासण्याचा स्पंज खातायेत या शहरातले लोक? वाचा यामागचं कारण

सोशल मीडियावर अनेक बेकरीमधील प्रॉडक्टचे व्हिडीओ शेअर केले जातात. त्यातल्याच एका व्हिडिओत लोक भांडी घासण्याचा स्पंज खाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली 02 एप्रिल : सध्याच्या काळात लोकांमध्ये प्रचंड क्रिएटिव्हिटी (Creativity) पाहायला मिळते. लोकांच्या भन्नाट कल्पना आणि त्यातून तयार झालेलं प्रॉडक्ट पाहिल्यावर बघतच राहावं वाटतं. अलीकडे बेकरी बिझनेसमध्ये रिअलिस्टिक केकची डिमांड खूप वाढली आहे. सुरुवातीला साधे केक असायचे, त्यानंतर वाढदिवस असणाऱ्याचा फोटो प्रिंट असणाऱ्या केकची लोकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. आता तर रिअलिस्टीक केकने (Realistic Cake) लोकांना अक्षरशः वेड लावलंय. आता हे रिअलिस्टीक केक म्हणजे काय तर हूबेहूब एखाद्या वस्तूसारखा दिसणारा केक. सोशल मीडियावर अनेक बेकरीमधील प्रॉडक्टचे व्हिडीओ शेअर केले जातात. त्यातल्याच एका व्हिडिओत लोक भांडी घासण्याचा स्पंज खाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल झाला आहे.

नवरदेवाचा प्रताप! नवरीऐवजी सासूला घातली वरमाला; पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

तैवानमध्ये स्पंज केक (Taiwan Sponge Cake) खूप लोकप्रिय होत आहे. होय, याचं कारण म्हणजे हा स्पंज केक अगदी घरातील भांडी घासण्याच्या स्पंजसारखा दिसतो. पहिल्यांदा हा केक पाहिल्यावर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही भांडी घासणारा स्पंज खात आहात. तैवानमध्ये सध्या या स्पंज केकची खूप डिमांड आहे. इथे बहुतांशी लोक एखाद्या रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) गेल्यावर स्पंज केकची ऑर्डर देतात. तुम्ही भांडी घासण्याचा स्पंज आणि या केकमध्ये फरक ओळखू शकणार नाही, इतका हा केक रिअलिस्टीक वाटतो. हा केक सामान्य पेस्ट्री किंवा केकपेक्षा महाग असतो. पण जेव्हा तुम्ही तो केक बघाल आणि त्याची चव घ्याल, त्यानंतर तुम्ही त्याचे पैसे आनंदाने द्याल. म्हणजे हा स्पंज केक (Sponge Cake) अगदी पैसावसूल आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या संदर्भात झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय.

बापरे! महिलेच्या कानात घुसला जिवंत खेकडा आणि...; VIDEO पाहूनच हादराल

या स्पंज केकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. हा केक तीन लेअरमध्ये (Three layer Cake) तयार केला जातो. रताळ्याच्या पानांचा वापर हिरवा लेअर तयार करण्यासाठी केला आहे, जेणेकरून ते निरोगी असावं आणि त्याचा रंगदेखील हूबेहूब दिसेल. उर्वरित केक अंडी आणि दुधाचा वापर करून बनवला गेला आहे. या केकचा फोटो फेसबुकवर टाकण्यात आला आणि नंतर तो तुफान व्हायरल झाला. या केकची सध्या खूप डिमांड असून तो लगेच विकला जातोय. दरम्यान, या एका केकची किंमत 300 रुपये आहे. तुम्हाला सहा केकचे एक पॅक खरेदी करायचे असेल तर कमीतकमी एक हजार रुपये खर्च करावे लागतील. तुम्हीही बेकरी प्रॉडक्टचे (Bakery Product) आणि विशेषतः केकचे (Cake) चाहते असाल तर हा स्पंज केक नक्की ट्राय करा. हा व्हायरल व्हिडीओ जरी तैवानचा असला तरी भारतातही हा केक नक्कीच मिळत असेल.
First published:

Tags: Tasty food, Viral news

पुढील बातम्या