नवी दिल्ली, 27 जानेवारी : आजकाल लोक घरामध्ये पाळीव प्राणी हमखास पाळताना दिसतात. याची एक क्रेझच तयार झाल्याचं पहायला मिळत आहे. आपापल्या आवडीनुसार लोक घरामध्ये पाळीव प्राणी ठेवत असतात. यामध्ये कुत्रा, मांजर, माकड, तर हमखास पहायला मिळतात. एवढंच नाही तर काहीजण सिंह आणि चित्ता देखील पाळतात. ज्या प्राण्यांचा विचार केला तरी धडकी भरते अशा प्राण्यांना लोक पाळीव करण्याचा विचार करत असतात. यातील एक धोकादायक प्राणी म्हणजे साप. तुम्ही कधी विचार केलाय का साप हे पाळीव प्राणी का नाहीत? जाणून घेऊया यावर तज्ज्ञ काय म्हणतात?
जगात हत्ती, घोडा, मांजर, कुत्रा, गाय, म्हैस, सिंह आणि चिता यासह सर्वात मोठे आणि धोकादायक प्राणी लोक पाळताना दिसतात, परंतु जेव्हा साप पाळण्याचा प्रश्न येतो तेव्हा तज्ञ सांगतात की साप पाळीव नसतात. यामागे कारणही तसंच आहे. विशेष म्हणजे जगात सापांच्या 2500 हून अधिक प्रजाती आढळतात, त्यापैकी 20 टक्के साप अत्यंत विषारी असतात. भारताबद्दल बोलत असताना, भारतात 300 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, त्यापैकी 50 प्रजाती तुम्हाला मारू शकतात. जगात सर्पदंशाने सर्वाधिक मृत्यू भारतात झाल्याचे अनेक आकडेवारीवरून दिसून येते.
हेही वाचा - सरकारी नोकरी करणारी मुलगी हवी! हुंडा मी देणार, तरुणाचा हटके VIDEO पाहून म्हणाल....
कोणत्याही प्राण्याला पाळीव प्राणी बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही प्राणी ते पटकन शिकतात, तर काही प्राण्यांचे प्रशिक्षण दीर्घकाळ चालते, परंतु सापाला कोणतेही प्रशिक्षण देणे हे खूप अवघड काम आहे आणि सापाला पाळीव प्राणी बनण्याचे प्रशिक्षणही देता येत नाही.
तज्ञ म्हणतात की साप काहीही शिकू शकत नाही. कारण त्यांच्याकडे सेरेब्रल गोलार्ध नसतो जो इतर प्राण्यांमध्ये असतो. सेरेब्रल गोलार्ध हा मेंदूचा एक भाग आहे जो गोष्टी शिकण्यास मदत करतो. साप काहीही शिकू शकत नाही, यामुळे सापाला पाळीव करु शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pet animal, Snake, Top trending, Viral, Viral news