मराठी बातम्या /बातम्या /Viral /तिबेटवरुन विमान का नाही उडत? भयानक आहे कारण

तिबेटवरुन विमान का नाही उडत? भयानक आहे कारण

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

तिबेटची अध्यात्मिक व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जगभरात वेगळी ओळख आहे. या प्रदेशावर चीन आपला अधिकार असल्याचं सांगत आहे. हा प्रदेश चीन आणि भारताच्यामध्ये हिमालयाच्या कुशीत वसलेला आहे. तिबेटला जगाचं छतदेखील म्हटलं जातं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Maharashtra, India

  मुंबई, 21 जानेवारी- तिबेटची अध्यात्मिक व पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जगभरात वेगळी ओळख आहे. या प्रदेशावर चीन आपला अधिकार असल्याचं सांगत आहे. हा प्रदेश चीन आणि भारताच्यामध्ये हिमालयाच्या कुशीत वसलेला आहे. तिबेटला जगाचं छतदेखील म्हटलं जातं. इथ उंच पठारं आहेत. या ठिकाणी जगातील सर्वांत उंच पठार असल्याचं म्हटलं जातं. हिमालयाच्या कुशीत वसलेला हा प्रदेश खूपच सुंदर आहे. पण या प्रदेशावरून विमानं उडत नाहीत. यामागचं कारण काय, ते जाणून घेऊयात.

  तिबेट हा पृथ्वीवरील त्या विशेष भागांपैकी एक आहे, जिथे विमानाची सेवा खूपच कमी आहे. इथल्या पर्वतांच्या उंचीमुळे विमानांना त्यावरून उड्डाण करणं शक्य नाही. त्यामुळे इथं विमानं उडताना दिसत नाहीत. व्यावसायिक विमानांसाठी परवानगी असलेली सर्वोच्च उंची 28 ते 35 हजार फूट म्हणजेच 8 हजार मीटर आहे. पण तिबेटमधील पर्वतांची उंची खूप जास्त आहे. त्यामुळे तिबेटच्या आकाशातून विमानं उडत नाहीत, इथं विमानं उडल्यास अपघाताचा आणि जीव जाण्याचा धोकाही जास्त आहे.

  (हे वाचा:अब्जाधीश बायकोचा असाही थाट, चक्क 24 कॅरेट सोन्याची लावली नखं )

  तिबेटमध्ये हवेच्या कमतरतेमुळे ते जगातील सर्वांत कमी दाबाचं क्षेत्र आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे इथं विमान उडवणं अशक्य आहे. या ठिकाणी विमानाने उड्डाण केल्यास प्रवाशांना ऑक्सिजनची गरज जास्त भासेल. तर विमानाशी संबंधित तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, प्रवाशांना इथं फक्त 20 मिनिटांसाठी ऑक्सिजन पुरवता येईल, विमान उंचीवर गेल्यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी होते. तसंच तिबेटमध्ये हवेची विरळता आहे, या दोन्ही गोष्टी लक्षात घेता इथं विमान उडवणं शक्य नाही.

  तज्ज्ञांच्या मते, तिबेटचे वातावरण बाकीच्या हवाई मार्गांपेक्षा खूप वेगळं आहे. ते माउंट एव्हरेस्टच्या जवळ असल्यामुळे, येथील हवा वेगाने वाहते. विमानाला इतक्या वेगवान हवेचा सामना करणं कठीण आहे. असं करणं म्हणजे मृत्यूला जवळ करण्यासारखं आहे. तसेच इथं धावपट्टी असली तरी ती इतकी अरुंद आहे की जगातील मोजकेच वैमानिक इथं विमान उतरवू शकले आहेत.

  तिबेटचं पठार मोठ्या पर्वतरांगांनी वेढलेलं आहे. उत्तरेला कुनलुन पर्वतरांग असून ती पठार आणि तारिम खोऱ्याच्या दरम्यान आहे. ईशान्येला चिलीची पर्वतरांग गोबी वाळवंटाला या भागापासून विभाजित करते. पूर्व आणि आग्नेय भागात खुल्या पठाराच्या ऐवजी जंगली खोरी आहेत. तिथं आशियातील अनेक प्रमुख नद्या उगम पावतात. सालवीन नदी, मेकाँग नदी आणि यांगत्झेकियांग नद्यांचा उगम तिथं होतो. या शिवाय भारतातील महत्त्वाची ब्रह्मपुत्रा नदीही दक्षिण तिबेटमधून उगम पावते.भारतातील लडाख प्रदेशदेखील याच पठारावर वसलेला आहे आणि जेव्हा कोणी दिल्लीहून लडाखला जातो तेव्हा तो संपूर्ण हिमालय पर्वतरांगा पार करतो आणि तिबेटच्या पठारावर पोहोचतो.

  First published:

  Tags: Viral, Viral news