मराठी बातम्या /बातम्या /Viral /मिरची तिखट का लागते? कधी विचार केलाय?

मिरची तिखट का लागते? कधी विचार केलाय?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

काही मिरच्या इतक्या तिखत असतात की, त्या खाल्ल्याने तोंडाची आग होते आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : मिरची ही जेवणाची चव वाढवते. त्यामुळे विविध पद्धतीने तिचा जेवणात वापर केला जातो. सुकलेली मिरची किंवा लाल मिरची असोत लोक वेगवेगळ्या पद्धतीने तिचा जेवणात वापर करतात. काही लोक तर मिरचीचा ठेचा किंवा लोणचं देखील खातात.

स्वयंपाकघरात मिरचीला महत्त्व आहे. घरातील प्रत्येक पदार्थात मिरचीचा वापर नक्कीच केला जातो. विशेषतः हिरव्या मिरच्यांचा वापर नक्कीच केला जातो, पण मिरच्या इतक्या तिखट का असतात? असा विचार कधी केलाय?

KISS करताना डोळे का बंद होतात? काय आहे याचं शास्त्रीय कारण?

काही मिरच्या इतक्या तिखत असतात की, त्या खाल्ल्याने तोंडाची आग होते आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तर काही मिरच्या या सामान्य असतात, ज्या तुम्ही सहज खाऊ शकतात आणि त्या तिखट लागत नाहीत. चला मिरचीच्या या गुणधर्माबद्दल जाणून घेऊ.

मिरचीमुळे अन्नाची चव वाढवते, परंतु त्याचा जास्त वापर केल्याने आपले नुकसान देखील होऊ शकते.

काही मिरच्या इतक्या तिखट असतात की त्यावर पाणी प्यायल्यावर देखील त्याचा तिखटपणा संपत नाही. मिरची हाताने कापली आणि चुकून तो हात डोळ्यांना लागला तर डोळ्यांची जळजळ होते.

तुम्ही कितीही पाण्याने हात धुतले तरी मिरचीचा जाळ किंवा तिखटपणा तुमच्या हातावर थोडीशी राहते आणि नंतर त्रास होतो.

मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे संयुग आढळते, ज्यामुळे मिरची तिखट होते. मिरचीच्या मधल्या भागात कॅप्सेसिन आढळते. हे मिरचीला बुरशी येण्यापासून वाचवते.

Capsaicin जिभेवर आणि त्वचेवर आढळणाऱ्या मज्जातंतूंवर त्याचा प्रभाव सोडते. Capsaicin नावाचे रसायन रक्तात सोडते ज्यामुळे जळजळ आणि उष्णता निर्माण होते. यामुळेच मिरची खाल्ल्यानंतर जळजळ जाणवते.

capsaicin विद्रव्य नाही

कॅप्सेसिन विरघळत नसल्यामुळे त्याची तिखटपणा पाण्याने जात नाही. मिरची खाल्ल्यानंतर तिखट लागेल तेव्हा नेहमी दूध, दही, मध किंवा साखरेचं सेवन करा, तरच तिखटपणा कमी होईल.

First published:
top videos

    Tags: Social media, Top trending, Viral, Viral news