धक्कादायकरित्या खड्ड्यात गेली धावती कार, पाहा खतरनाक VIDEO

धक्कादायकरित्या खड्ड्यात गेली धावती कार, पाहा खतरनाक VIDEO

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर खरतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

  • Share this:

रिओ, 23 नोव्हेंबर : भारतात खड्ड्यांची समस्या सर्वज्ञात आहे. परिणामी या खड्ड्यांमुळे भारतात अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. मात्र काही प्रकार असे घडतात, जे पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एका गाडी संपूर्णपणे खड्ड्यात गेला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर खरतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. मुख्य म्हणजे दैव बलवत्तर म्हणून असा खतरनाक अपघात होऊनही कोणालाही जखम झाली नाही. हा व्हिडीओ भारतातला नसून ब्राझीलमधील आहे. ब्राझीलच्या रिओ ग्रांडेमध्ये चक्क रस्त्याच्यामध्ये एक मोठा खड्डा झाला, यात ही गाडी अडकली. ही घटना नक्की कशी घडली, याचा शोध अजूनही सुरू आहे.

दरम्यान या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या चित्रातून, रस्त्यावर जो ट्रक जात होता, त्या मागे एका महिला गाडी चालवत होती. ट्रक पुढे गेल्यानंतर महिलेनं लेन बदलली. लेन बदलल्यानंतर पुढे खड्डा आहे हे दिसले नाही, त्यामुळं संपूर्ण गाडी खड्ड्यात गेली. त्यानंतर महिला जोर जोरात ओरडू लागली. तेव्हा शेजारच्या घरातल्या लोकांनी आणि गाडी चालकांनी महिलेला बाहेर येण्यास मदत केली. सुदैवाने या अपघातात कोणीच जखमी झाले नाही.

वाचा-'या' साेप्या प्रश्नावर स्पर्धक KBC 11 मधून बाहेर, तुम्हाला माहित आहे का उत्तर?

वाचा-नोकरीसाठी आता रोबो घेणार इंटर्व्ह्यू, या बँकेने केली नवी सुरुवात

चारचाकी चालवणाऱ्या या महिलेचे नाव कॅवेगनॉली आहे. कॅवेगनॉली आपली मुलगी अंड्रेस कारनेलासोबत जात होती. गाडी खड्ड्यात पडली तेव्हा अंड्रेस कारनेला यांच्या नाकाचे हाडे तुटले. खड्ड्यात पडल्यानंतर कॅवेगनॉलीनं दरवाजा खोलून बाहेर येण्याचा कसा तरी प्रयत्न केला. त्यानंतर या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या ट्रकमुळे या रस्त्यात खड्डा पडला की काय, याबाबत चौकशी सुरू आहे.

वाचा-बापरे! गंगेत सापडला 18 किलोचा जम्बो मासा, किंमत वाचून व्हाल थक्क

Published by: Priyanka Gawde
First published: November 24, 2019, 7:25 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading