मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दारू पिऊन रस्त्यात दादागिरी, चर्चेत राहण्यासाठी स्टंट करणारा बॉबी कटारिया कोण?

दारू पिऊन रस्त्यात दादागिरी, चर्चेत राहण्यासाठी स्टंट करणारा बॉबी कटारिया कोण?

 रस्त्यावर दारू पिऊन 'दादागिरी', विमानात धुम्रपान... कोण आहे बॉबी कटारिया, ज्याचा व्हिडीओने उडालीय खळबळ

रस्त्यावर दारू पिऊन 'दादागिरी', विमानात धुम्रपान... कोण आहे बॉबी कटारिया, ज्याचा व्हिडीओने उडालीय खळबळ

रस्त्यावर दारू पिऊन 'दादागिरी', विमानात धुम्रपान... कोण आहे बॉबी कटारिया, ज्याचा व्हिडीओने उडालीय खळबळ

  • Published by:  Kranti Kanetkar
उत्तराखंड 19 ऑगस्ट : प्रसिद्धी आणि दहशत निर्माण करण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. विमानात स्मोकिंगचे व्हिडीओ शूट करून तर आता रस्त्यावर बसून दारू पिण्याचे प्रताप केले. जो आपल्या कामामुळे नाही तर अशा स्टंटमुळे चर्चेत राहिलाय तो नेमका बॉबी कटारिया कोण आहे? जाणून घेऊया. बॉबी कटारिया पुन्हा एकदा चर्चेत आला. याचं कारण म्हणजे नुकताच त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो रस्त्यावर बसून बिनधास्त दारू पित असल्याचं दिसत आहे. त्याची ही दादागिरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वी त्याचा विमानात स्मोक करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. या प्रकरणी देहरादून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात FIR दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीनं रस्त्यावर टेबल आणि खुर्ची ठेवली. त्यावर बसून दारू पिणं सुरू होतं. एवढंच नाही आरोपीने दारूच्या नशेत बेजबाबदारपणे बाईक चावली. सार्वजनिक ठिकाणी हे करणं गुन्हा आहे हे माहिती असताना त्याने असं कृत्य केलं. ब्युटी सलूनमध्ये गेली म्हणून बायकोला भयानक शिक्षा; नवऱ्याच्या संतापजनक कृत्याचा VIDEO VIRAL उत्तराखंड इथे फिरायला आलेल्या बॉबीने किमाडी मसूरी रस्त्यावर हा व्हिडीओ काढल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्यावर कलम 342/336/ 290/ 510 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टंटबाज बॉबी कटारिया कोण? बॉबी कटारिया हा सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ करतो. तो मूळचा हरियाणातील गुरुग्रामचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 6 लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. बॉडी बिल्डिंगची आवड असलेला कटारिया स्वतःला एक सामाजिक कार्यकर्ता असल्याचा दावा करतो. काळ आला होता पण वेळ नाही! अवघ्या 10 सेकंदावर मृत्यू फक्त 8 पावलांमुळे वाचला जीव; Watch Video कोरोना काळात त्याने अनेक गरजू लोकांना मदत केली होती. तो सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतो. सध्या त्याचे हे स्टंटबाजी करणारे व्हिडीओ तुफान चर्चेत आहेत. 2017 मध्ये बॉबी विरोधात गुरुग्राम पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी बॉबीने पोलिसांवर हल्ला केल्याचंही सांगितलं जातं. कटारियाविरोधात 6 केस आहेत.
First published:

पुढील बातम्या