मराठी बातम्या /बातम्या /Viral /

'या' 3 खास व्यक्ती, ज्या जगात कुठे ही पासपोर्ट शिवाय फिरु शकतात; ते पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाहीत तर...

'या' 3 खास व्यक्ती, ज्या जगात कुठे ही पासपोर्ट शिवाय फिरु शकतात; ते पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाहीत तर...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

हे ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटलं असेल की, हे कसं शक्य आहे? जर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना देखील पासपोर्ट लागत असेल, तर हे असे लोक कोण आहेत, ज्यांना प्रवास करताना पासपोर्ट लागत नाही?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई 29 सप्टेंबर : आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करायचा झाला की, त्यासाठी पासपोर्ट हा लागतोयच. त्याच्या शिवाय कुठेही प्रवास करणं शकत नाही. खरंतर हा पासपोर्टचा प्रकार सुरु होईन आता 102 वर्ष झाली आहे. या पूर्वी पासपोर्ट हा प्रकार नव्हता. परंतू आता मात्र लहान मुलांपासून ते पौढांपर्यंत सगळ्यांनाच पासपोर्टची गरज भासतेच.

अगदी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना देखील एका देशातून दुसऱ्या देशात जातातना डिप्लोमॅटिक पासपोर्टही ठेवावा लागतो. परंतू तुम्हाला माहितीय यामध्ये असे 3 लोक आहेत, ज्यांना कुठेही प्रवास करताना पासपोर्ट लागत नाही.

आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटलं असेल की, हे कसं शक्य आहे? जर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना देखील पासपोर्ट लागत असेल, तर हे असे लोक कोण आहेत, ज्यांना प्रवास करताना पासपोर्ट लागत नाही? चला तुमच्या प्रश्नांचं उत्तर जाणून घेऊ.

हे वाचा : ट्रक झाला चालता फिरता लग्नमंडप, Video शेअर करण्यापासून आनंद महिंद्रा देखील स्वत:ला रोखू शकले नाही

कोण आहेत हे तीन खास लोक

हे खास लोक म्हणजे ब्रिटनची राणी/ राजा आणि जपानचा राजा, तसेच राणी. चार्ल्स तिसरे राजा होण्यापूर्वी हा विशेषाधिकार राणी एलिझाबेथकडे होता.

चार्ल्स तिसरे ब्रिटनचा राजा होताच, त्यांच्या सचिवाने आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत सर्व देशांना कागदोपत्री संदेश पाठवला की आता ब्रिटनचा राजा चार्ल्स आहे, त्यामुळे त्याला पूर्ण सन्मानाने कुठेही प्रवास करण्याची परवानगी द्यावी. यामध्ये कोणतेही बंधन नसावे. तसेच, त्यांच्या प्रोटोकॉलची विशेष काळजी घेतली पाहिजे.

आता प्रश्न असा उपस्थीत होतो की मग या राजाची बायको किंवा मुलांना कोणती सवलत आहे का?

तसे, जिथे ब्रिटनच्या राजाला हा अधिकार आहे, तिथे त्याच्या पत्नीला हा अधिकार नाही. त्यांच्यासोबत दुसऱ्या देशात जर ते गेले, तर त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट सोबत ठेवावा लागेल. त्याचप्रमाणे राजघराण्यातील प्रमुख व्यक्तींनाही डिप्लोमॅटिक पासपोर्ट ठेवण्याचा अधिकार आहे. अशा पासपोर्ट धारकास विशेष लक्ष आणि आदर दिला जातो. कोणत्याही देशातील विमानतळावर त्यांचा येण्याचा मार्गही वेगळा असतो.

हे वाचा : तुम्हाला डुक्कर आवडत नसले तरी त्यांच्याबद्दलचे हे Facts तुम्हाला आश्चर्यचकित करतील

पासपोर्टची सुविधा का आणि केव्हा पासून सुरु झाली.

खरंतर 20 व्या शतकाच्या सुरुवातीला असे दिसून आले की, एका देशातून दुसऱ्या देशात लोक गुपचूपपणे येत आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवले नाही, तर अनेक समस्या निर्माण होतील. किंबहुना समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या.

त्यानंतर 1920 मध्ये अचानक सर्वकाही बदलले. आपल्या देशात येणाऱ्या स्थलांतरितांची चोरी थांबवता यावी यासाठी जगभरात पासपोर्टसारखी व्यवस्था निर्माण करण्यासाठी अमेरिका पुढाकार घेऊ लागलं, यावर लीग ऑफ नेशन्समध्ये गांभीर्याने विचार करण्यात आला. 1924 मध्ये अमेरिकेने आपली नवीन पासपोर्ट प्रणाली जारी केली.

आता पासपोर्ट हे दुसऱ्या देशात जाणाऱ्या व्यक्तीचे अधिकृत ओळखपत्र बनले आहे. ज्यामध्ये त्याचे नाव, पत्ता, वय, फोटो, नागरिकत्व आणि स्वाक्षरी सर्व आहे. तो ज्या देशात जातो त्या देशासाठी ते सोपे होते. आता सर्व देशांनी ई-पासपोर्ट जारी करण्यास सुरुवात केली आहे.

First published:

Tags: Marathi news, Shocking, Viral news