मैना नाही तर चक्क कुत्र्याच्या प्रेमात पडला पोपट; प्रपोज करतानाचा VIDEO VIRAL

मैना नाही तर चक्क कुत्र्याच्या प्रेमात पडला पोपट; प्रपोज करतानाचा VIDEO VIRAL

एका पांढऱ्या पोपटाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तूफान व्हायरल होत आहे. तो पाहिल्यावर तुम्हालाही खूप आश्चर्य वाटेल. या व्हिडीओत पांढरा पोपट आहे आणि तोही माणसासारखा बोलताना दिसतोय.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मार्च : इंटरनेटवर लहान कुत्री, माजरं आणि इतर पाळीव प्राणी या सगळ्यांचं खूप कौतुक केलं जातं. अनेक पाळीव प्राणीप्रेमींनी त्यांच्या प्राण्यांच्या नावाची प्रोफाइलही उघडली आहेत. त्या प्राण्याने काय गमती-जमती केल्या ते इंटरनेटवर शेअर करण्याचं काम हे मालक करत असतात. काही जण फोटो टाकतात, तर काही जण व्हिडिओ टाकतात.

असाच एका पांढऱ्या पोपटाचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तूफान व्हायरल होत आहे. तो पाहिल्यावर तुम्हालाही खूप आश्चर्य वाटेल. आपल्या भारतात सापडणारा हिरवा पोपट हा बोलतो हे सर्वांनाच माहितेय. पण या व्हिडीओत मात्र पांढरा पोपट आहे आणि तोही माणसासारखा बोलताना दिसतोय.

विंडी मारी ही एक प्रसिद्ध नेटिझन आहे, ती नेहमी प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ पोस्ट करत असते. तिच्या व्हिडीओंवर लोक प्रतिक्रियाही येत असतात. विंडीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये विंडी आपला पांढरा पोपट स्वीट पी याची, विंडीच्या मांडीवर असलेल्या काळ्या कुत्र्याच्या पिलाशी ओळख करून देताना दिसते. त्याचवेळी हा पोपट त्या कुत्र्याच्या डोक्यावरुन मायेने उजवा पाय फिरवतो आहे असं दिसतं. काही क्षणांत विंडी स्वीट पी ला म्हणते त्या कुत्र्याच्या पिलाला, ‘I love You’ म्हण. आणि खरोखरच तो पोपट त्या कुत्र्याला ‘I love You’. या व्हिडीओला विंडीनी दिलेल्या कॅप्शनमध्ये ती लिहिते, ‘स्वीट पी कुत्र्याच्या पिलाला पहिल्यांदा भेटतो तेव्हा.’

(वाचा - महिना 7 लाख रुपये पगार, आवडीचं काम, राहणं-खाणंही फ्री; या कंपनीची जबरदस्त नोकरी)

(वाचा - एवढ्याशा पालीची शिकार करणं सिंहाला पडलं चागलंच भारी; नेमकं काय झालं पाहा VIDEO)

हा व्हिडीओ नेटकऱ्यांमध्ये प्रचंड लाईक केला जात आहे. या पोस्टवर एकाने प्रतिक्रिया दिली आहे, ‘मी आतापर्यंत पाहिलेल्या गोड व्हिडिओंपैकी एक. प्रत्येक प्राणीमात्राला प्रेमाची आणि एकत्र राहण्याची गरज असते हे या व्हिडीओतून दिसतं.’ विंडीने शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून प्राणीप्रेमींसाठी हा व्हिडीओ पाहणं ही पर्वणीच ठरत आहे.

First published: March 26, 2021, 9:32 AM IST

ताज्या बातम्या