जंगलात फिरायला गेले असता गाडीत अचानक शिरला चित्ता; पाहा VIDEO मध्ये पर्यटकांनी कसा वाचवला जीव

जंगलात फिरायला गेले असता गाडीत अचानक शिरला चित्ता; पाहा VIDEO मध्ये पर्यटकांनी कसा वाचवला जीव

चित्त्यापासून जीव वाचविण्याचा हा थरारक व्हिडीओ..

  • Share this:

लोगों को अनेकांना जंगलात फिरणं आणि प्राणी-पक्ष्यांसोबत वेळ घालवायला आवडतं. मात्र अशा प्रकारच्या आवडी अनेकदा जीवघेण्या ठरू शकतात. अशीच घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. हा प्रसंग तंजानियाच्या (Tanzania) एका पर्यटकासोबत घडला आहे. हा पर्यटक तंजानियाच्या गोल काॅप्स सेरेन्गेटी नॅशनल पार्कात फिरण्यासाठी गेला होता. त्यांच्यासोबत जीपमध्ये आणखी एक पर्यटक होते. ते येथे काही प्राणी-पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी आणि जंगताल फिरण्यासाठी गेले होते.

ते खूप उत्साही होते.  ते एका जीपमध्ये बसले होते आणि आपल्या कॅमेऱ्यामधून फोटो काढायला लागले. जेव्हा ते जीपच्या आत होते तेव्हा एका चित्त्याने कार पाहिली आणि हळूहळू गाडीच्या दिशेने जाऊ लागला. आणि काही सेकंदात चित्ता त्याच्या गाडीत जाऊन बसला. चित्त्याला पाहून सर्व पर्यटक हैराण झाले. सर्वजण चित्त्याकडे पाहत होते आणि चित्ता शिकारीच्या शोधात इकडे-तिकडे पाहत होता. हे पाहून पर्यटक पुरते घाबरुन गेले.

मात्र त्यांच्या गाइडने सांगितले की चित्ता त्यांना त्रास देणार ही. टुरिस्ट गाइडने सांगितले की, जर तुम्ही अत्यंत हळूवारपणे श्वास घ्याल तर चित्त्याला आपल्यापासून धोका असल्याचे वाटणार नाही. सोबतच तो आपल्यावर हल्ला करणार नाही. त्यानंतर अचानक साधारण 10 सेकंदानंतर चित्ता पर्यटकांना नुकसान न पोहोचवता बाहेर निघून गेला.

हे ही वाचा-बाप से बेटा सवाई...3 वर्षांचा लहानगा घेतोय वडिलांकडून संगीताचे धडे; VIDEO VIRAL

चित्ता बराच वेळ गाडीभोवती फिरत होता..काही वेळ तो गाडीच्या बोनेटवर जाऊन बसला व तेथील परिस्थितीचा अंदाज घेत होता. यातील एकाने चित्त्याचा हा व्हिडीओ शूट केला आहे. या पर्यटकांनी प्रसंगावधान राखल्याने या चित्त्याने त्यांच्यावर हल्ला केला नाही. गाइडने सांगितल्यानुसार ते शांत बसून राहिले..अन्यथा येथे अनर्थ झाला असता.

Published by: Meenal Gangurde
First published: October 19, 2020, 4:45 PM IST

ताज्या बातम्या